[५५९] श्री. २३ जुलै १७२१.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ४८ प्लवनामसंवत्सरे श्रावण शुध्द दशमी रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभु छत्रपति स्वामी यांणीं राजमान्य राजश्री रायाजी मल्हार व मल्हारराव रायाजी यांसी आज्ञा केली ऐसीजे- हालीं राजश्री जयसिंगराव जाधवराव यांणीं हुजूर कितेक अर्थ लेहून व सांगोन पाठविला त्याचें उत्तर त्यांस पाठविलें आहे, त्यावरून तुह्मांसही कळेल. तुह्मीं शहाणे लोक आहां. स्वामीच्या पायाशी निष्ठा बहुत धरितां.जाधवराव यांस स्वामीचे मनसुब्याचें यश येतें. ते तुमचे ठायीं बहुत ममता धरतात. ये गोष्टीचें निदर्शन समयविशेष तुमच्या प्रत्ययास येईलच. स्वामीच्या कार्यभागाविषयी बहुत सादर असत जाणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें.
मर्यादेयं
विराजते.