[५६६] श्रीगुरुसमर्थ २० डिसेंबर १७२१.
श्रीमन्महानाईक नडगोट नुगजूरी बदरद होनरी राजाधिराजश्री सिदप्पानाईक खेपा देसाई नाडगौडा प्रांत गोकाक व सरदेसाई सर नाडगोंडा सरकार रायेबाग व प्रांत तेरदाल व पादशापूर व नाडगौंडा तो आजरें व चांदगड महालानिहाय ता सिदण्णा वल्लद बोलाणा चाकरी दि॥ सरकार देसगत प्रा मजकूर. सु इसने आशरेन मया आलफ. कारणें करून दिल्हे इनामखत ऐसाजे. सन तिसा आशर मया आलफमध्यें श्रीमंत राजश्री पाराशरवासी यांनीं वडगांवावरी मोकाम केला असतां श्रीमंत राजश्री स्वामी सातारवासी याचे फौज येऊन युध्य प्रसंग जाले. तेसमयीं तुवां साहेबाबरोबर खस्त केली. चिरंजीव राजश्री शिवलिंगाप्पा पाडाव होऊन त्यांचे हातास लागून गेला. त्याबरोबरी दोन्ही वरीस हाताखालीं खस्तीनें चाकरी करून टिकून राहिलेस. याउपरि साहेब तुजवर संतोषी होऊन आपले खासगत नाईकी इनाम मौजे कलहोला जमीनपैकी रुके + बारा आरा रकम होन ७॥ साडेसाताचें शेत इनाम आजरामऱ्हामत करून दिला असे. सदरहू जमीन चंद्रसूर्य ऐसिजेत व पुत्रपौत्र लेकराचे लेकर पावतों भोगवटा करून घेऊन साहेबसेवेवरी जन्मोजन्म सादर होऊन राहणें. हें करून दिल्हें इनामती कोणी दिक हरकत करणें निसवत नाहीं. खातरजमा राखोन इनामती जमीन भोगवटा करून घेऊन सुखरूप असणें. जाणिजे. छ १५ माहे रबिलावल. मोर्तबसुद.