[५६०] श्री. २४ नोव्हेंबर १६८६.
॥सौजन्यसागर महामेरू राजश्री धनाजी जाधव तथा राजश्री शिवाजी जाधव पटेल मौजे माजीगाऊ गोसावी यांसी. प्रति सेवक अनाजी बिन हरजी व जानोजी बिन तुकोजी व सोनजी बिन रेवजी पटेल मौजे बोरगाऊ दोनी कर जोडून विनंति, सबा समानीन अलफ, लेहून दिल्हा कागद ऐसाजे:- सालमजकुरीं मुलकांत दुकाळ पडला. ऐसियासी आपणास एक दिवसाचें खावयास नाहीं. ह्मणवून आह्मीं तुह्मापाशीं येऊन आपल्या आत्मसंतोषें आपले खासा तकशीम पैकीं तकशीम घेऊन आपणांस वांचविलें पाहिजे. ऐसियासी तुह्मी उत्तर दिल्हें जे तुमचे वतनभाऊ व बारा बलुते यांच्या विद्यमानें पैके देऊं. त्यासारखी तकशीम घेऊं. इ. इ. इ. छ १७ मोहरम इ. इ. इ.