पै॥ छ २३ रजब लेखांक १५७. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
सन इहिदे समानीन. श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. राजश्री राव सिंदे यांचें पत्र येत नाहीं. ऐसें नवाबसाहेब विचारूं लागले त्यास, वाटेच्या खलशामुळें दिरंग लागला ऐसें उत्तर केलें. उगेच राहिले. आमचा पत्राविशीं मात्र गुंता. बहुधा बेंगरुळापावेतों जावें लागेल ह्मणोन लिहिलें. ऐसियास, शिंदे यांचें थैलीपत्र आलें तें पेशजीं तुह्मांकडे रवाना केलें, पावलें असेल. आतां तुमचा गुंता होणार नाहीं. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.