पै॥ छ २३ रजब सन लेखांक १६०. १७०२ ज्येष्ठ व॥ ५.
इहिदे समानीन. श्री. २२ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णरावतात्या स्वामींचे सेवेसीं:--
पो॥ कृष्णराव बलाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावून वर्तमान कळलें. नवाबसाहेब खेमेदाखल जाले. हे सलाह ऐन पडली. आतां दरकूच जाण्यांत काम मुकामत कोठें न व्हावी. राव सिंदे यांचें थैलीपत्र आलें तें पेशजीं रवाना जालें. पावलें असेल. वरकड इकडील व राजश्री परशरामपंतभाऊंकडील सविस्तर राजश्री नाना याणीं लिहिलें, त्यावरून कळेल. सारांश, नवाबसाहेब यांचे जाणें लौकर होऊन कार्यभाग उगवून तुह्मीं यावें. र॥ छ १८ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.
राजश्री गणपतराव स्वामींचे सेवेसीं सां। नमस्कार. सविस्तर राजश्री नाना व रावेरास्ते यांणीं लिहिल्यावरून कळेल. हे विनंति.