लेखांक १५५.
१७०२ ज्येष्ठ वद्य ३ वृद्धि. श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. पिलरी घांटावर घांटाखालीं नागापट्टण, श्रीव्यंकटेश, नेळूर, सर्वापली. पल्ला लांब. कालहस्ती व्यंकटेशापलीकडे. तेव्हां, मीर रजा यांची दौड तालुका मारावयास कोणत्या मार्गें गेले, घांट कोणता उतरले. खासा मीर कोठें आहेत, इंग्रजाची जमी-येत किती, कोणे ठिकाणीं आली किंवा नाहीं याचा अर्थ माहितगिरीनें पक्कें समजोन, नवाबबहादर यांस पुसोन तपसीलवार ल्याइवें. कोडियाळ बंदरास इंग्रजांचीं दोन जहाजें धरलीं. पुढें गल्ला वगैरे भरून देणें एविशीं ताकीद निक्षूण जाली आहे, ह्मणोन नवाबबहादर यांणीं सांगितलें. फार उत्तम. त्यांचें माणूस व जहाज कोठें खुसकीस उतरूं न पावे ऐसें केलेंच आहे. ताकीदही वरचेवर असावीच. एविशीं नवाबबहादर यांस ल्याहवें ऐसें नाहीं. सर्व मनसबे व दरजे त्यांचे चित्तांत आहेत. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.