पै॥ छ २३ रजब सन लेखांक १५९. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
इहिदे समानीन. श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं: --
विनंति उपरी. नवाबसाहेब वैशाख व॥ येकादसीस इंदुवारीं सहा घटका दिवसा खेमे- दाखल जाले. संध्याकाळी आह्मांस बोलावून श्रीमंतांच्या स्नेहाच्या गोष्टी जाल्या. रोजबरोज दोस्तीची तरकी होत असावी. हेच इच्छा X यांची. तोफखाना वगैरे सरंजाम बेंगरुळास अगोधरच रवाना जाला. तमाम फौजा व पाळेगार यांस ताकीद गेल्या कीं:- लौकर बेंगरुळास दाखल होणें. बेंगरुळावरही बहुत मुकाम होवयाचे नाहींत. मिर रजाखां याणीं नेलूर, सर्वापली, भंगारकाल, हास्ती वगैरे तालुके मारून ताराज केले ह्मणोन लिहिलें. त्यास, नवाबबहादर खेमेदाखल जाले. हे गोष्टी फार चांगली व मसलतीस योग्य केली. याउपरी जलदींत फायदा बहुत. दरकूच टोपीकरांसीं नमूद होऊन त्यांस सजा व्हावी. जलदी केल्यानें त्यास पकी तंबी नवाबबहादुरांकडून अमलांत येईल येविशींची खातरजमा आहे. जलदी मात्र व्हावी. मिर रजाखां याणींही चांगली केली. इंग्रज कोठें जमा जाले, पलटणें कोठें आली किंवा नाहींत याचा त॥ ल्याहावा. सारांष, आतां जाण्यास दिवसगत न लागावी. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.