पै॥ छ २३ रजब सन लेखांक १५६. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
इहिदे समानीन. श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. येथोन नवाबबहादर यांजपासीं रहाण्यास रवळो भिकाजी रवाना जाले आहेत ह्मणोन, नवाबबहादूर यांस आनंदराव यांणीं लिहिलें व राजश्री गणपतराव यांणींही सांगितले त्यावरून नवाबसाहेब याणीं जाबसाल केला कीं:- येथें कोण्ही उमदा असावा. तुह्मीं जाऊन मदारुलमाहाम यांस भेटून तुह्मीं अगर गणपतराव यांणीं यावें. रवळोपंत यांस पाठवूं नये, ऐसें ल्याहावें ह्मणोन सांगितलें. रवळोपंतास पाठवूं नये ऐसी येथील मर्जी ह्मणोन लिहिलें. ऐसियास, तुमचे लिहिल्या अगोधर रवळोपंत रवाना जाले ते तुह्मांपासीं येतील. नवाबबहादूर यांचे विचारें त्यांस ठेवावें. ऐसें जालिया ठेवून यावें, न जाल्यास त्यांज बराबर घेऊन यावें. येथें आलियानंतर मग रवाना करणें त्यास केलें जाईल. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.