Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४४.
इ. स. १७६७ ता. ८ सप्तंबर श्री. भाद्रपद शुद्ध १५ शके १६८९
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी
यांसि------------------------------------------
अखंडित लक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्नो माहादजी शिंदे दंडवत. विनंति उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असले पाहिजे. विशेष बहुत दिवस जाहले तुम्हांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तरी सविस्तर लिहून पाठवावें. जातेसमई आपले आमचें बोलणें कितेक अर्थे–करून जाहलें त्याच लक्षावरी आम्ही कायम असो. दरम्यान कितेक गोष्टी लौकिकांत येतात त्या आपणास कळोन संशय आपलें चित्तांत असेल; त्यास त्या गोष्टी झाडून मिथ्या. आपण आह्मांसी बोलले त्याप्रमाणें आपलाहि विचार कायम असावा. पुढें कर्तव्य अथवा न कर्तव्य जो विचार करणें तो आपल्या विचाराशिवाय होणार नाहीं, येविशींची खातरजमा असावी. वरकड देशी कित्येक २उभयतांत विरुद्धभाव एकितो त्यास तुम्हीं तेथें असतां ऐशा गोष्टी नसाव्या. कारण की घरकलह कामाचा नाही. दौलतीस अपाय होतो. बरें आम्हीं येथील गुंता उरकून श्रीचे दर्शनाकरितां येतच असों. आल्यानंतर तुमची आमची भेट होऊन पुढील कर्तव्य ते केलें जाईल. वरकर कितेक राजश्री बाळाजीपंताचें पत्रावरून कळेल. रा।।० छ १ रबिलाखर *बहुत काय लिया हे विनंती
पे।। छ १४ रबिलाखर भाद्रपद समान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४३.
इ. स. १७६७ ता. १२ आगष्ट. श्रीकृष्ण. श्रावण वद्य ३ शके १६८९
श्रीमंत राजश्री चिंतापंत तात्या स्वामीचे सेवेसी
सेवक नानाजी कासी व जिवाजी कासी एवलेकर मुक्काम ज्यणस्तान (जनस्थान ) नमस्कार विनंती उपरी. रा। गोविंदराव माहादेव यांनी वरात रा। केदारजी सिंदे यांजवर दिली रुपये ११७०८॥ अकरा हजार सातशें साडेआठ. हेवरात वसूल करून खामख्हा स्वाधीन रुपये आले म्हणजे याची तिजाइ१ आम्ही स्वामीस देऊं बाकी ऐवज आम्हीं आपला घेऊं. हें लेहून दिल्हें सही हस्ताक्षर जिवाजी कासी शके १६८९ सर्वजित नाम संवत्छरे श्रावण वदि ३
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४२.
१७६७ ता. २८ जुलई श्रीपांडुरंग १६८९ श्रावण शुद्ध
राजश्रिया-विराजित-राजमान्य-राजश्री चिंतोपंत तात्या स्वामीचे सेवेसी-.
पो १त्र्यंबकराव माहदेव व गोविंद माहादेव साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहावें. विशेष. आपणास राजश्री केदारजी सिंदे व रा। माहादजी सिंदे यांजवर वरात रुपये १९०४५ एकूण चाळीस हजार पंचेचाळीस रुपये देविले तपसील
*![]() |
४१३६ | नानाजी नाईक व जिवाजी नाईक येवलेकर बा। |
७५७२॥ | यादोराव रघुनाथ भागवत वगैरे ता। ५७९५ खुद्द मशारनिले २०५ गोविंद बल्लाळ खांडेकर ५०० आबा दीक्षित १०७२॥ व्याजा बा। ---------- ७५७२॥ |
|
७३३६॥ | धोंडाजी जगनाथ रेघे बा। | |
-------------- | ||
१९०४५. |
सदरहू एकूणीस हजार पंचेताळीस रुपये यांची वरात दिल्हे आहे. रुपये आपणास न पावले तरी रुपये व्याजसुद्धां आह्मीं देऊं. मिती श्रावण शुद्ध ३ त्रितीय। शके १६८९ सर्वजित् नाम संवत्छरे. बहुत काय लिहिणे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४१.
इ. स. १७६७ ता. २४ जुलै श्री. आषाढ वद्य १४. शके १६८९
यादी शिंद्याकडील सरदारी पैकीं गाव वि॥ मोरो विठ्ठल सु॥ सबा सितैन मया व अलफ गांवचा आकार रुपये
![]() |
४४६२ | मौजे साकेगांव प॥ सेवगांव हा गांव सन खमसांत अखेरीस पालखीबद्दल दिल्हा. कारकीर्द माहादाजी गोविंद जमाबंदी सीत ता॥ रुपये |
|
२६६२ | सनसीत जमाबंदी कच्चा रोख रुपये ५९७९ पैकी वजा मोकासा व बाबतीवर सरदेशमुखी व गावखर्च वगैरे मिळोन रुपये २३१७ बाकी ऐवज आला ३६६२ रुपये पो वजा अनुष्ठान श्रीसिध्धटेकाचे देवाकडे गणपतीस रुपये १००० नेहमी बाकी |
||
![]() |
१८०० | सनसबा आजमासे हिशेब पक्का न आला सबब कुलखर्च समजाऊन बाकी निकाल ऐवज एईल अजमासे |
|
------ | |||
४४६२ | |||
![]() |
गोहेदेच्या मुक्कामी सखुबाई शिंदी यांस इनाम एदलाबाद करून दिल्ही ते समई गांव त्यांनीं दिल्हे. साल मजकुरीं रुपये। |
||
० | मौजे चापडगांव पो शेवगांव येथें अंमल सालमजकुरीं बसली नाहीं कारण कीं अद्यापी सखूबाईच्या अंमलास ठिकाण नाहीं सबब अंमल चालू नाहीं. नरहर लक्ष्मणराव कमाविसदार पा। मा।र यानें खळखळ केली आहे सबब ऐवज न आला. |
||
![]() |
मौजे भुसावळ पा। एदलाबाद साल मजकूर पैकीं | ||
जमाबंदी कच्चारोखा टक्के *२६५८।६. पा। वजा टक्के | |||
![]() |
९११ माजी अंमलदार यांजकडे | ||
३०९ मोकासा दर शेकडा टक्के १८॥। टके |
|||
--------- | |||
१२१० | |||
बाकी टके १३३।।। दर रुपये १।।। प्रो ए।। रुपये |
|||
------------- | |||
---------- | ![]() |
||
![]() |
देह सुमार ३ |
देह सुमार तीन एकूण जमा पांच हजार दोनशे सत्तावीस रुपये दोन आणे करार. सदरहू ऐवज पैकीं गांवगन्ना बाकी ऐवज थोडा बहुत अस्सल चौकशी करून जो असेल तो समजावा. करार छ २७ सफर सन समान सितैन आषाढ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४०.
१७६७ ता. २४ जुलई श्रीशंकर. १६८९ आषाढ वद्य १४
यादी नि॥ चिंतो विठ्ठल सिंदे यांच्या फडणिस संबंधें तुह्मां कडेस *तफावतीचीं कलमें लिहून आलीं होतीं त्यांची २चौकशी करतां तुह्मांकडेस तफावत लागली नाहीं. सर्व प्रकारें खातर-जमा राखणें. येक-निष्ट शेवा करणें. येणेप्रो करार.
छ २७ सफर सन समान सितैन आषाढ मास.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३९ अ.
इ. स. १७६७ ता. १९ सप्तेंबर श्री. शकें १६८९ भाद्रपद वद्य १२
श्रीमंत् राजश्री चिंतोपंत तात्या स्वामीचे सेवेसीः
विनंति सेवक विठ्ठल केशोराव बुरटे सां। नमस्कार विनंति उपर श्रीमंत मातुश्री चिमाबाई शिंदे यांस खासगत खर्चास श्रीमंत राजश्री माधवराव शिंदे१ यांनी आपणांकडून देविले रुपये पंचवीस हजार पैकीं तूर्त स्वामीनीं दिल्हे रुपये १०००० दहा हजार रोख आपण भरून पावलों. छ २४ माहे रबिलाखर मित्ती भाद्रपद वद्य १२ द्वावशी शनवार.
हा।ॐ साक्ष्य
खंडाप्पा चिखले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३९.
इ. स. १७६७ ता. ८ जुलई. श्री. आषाढ शुद्ध १२ शके १६८९
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यासिः-
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्ने।। माहादजी सिंदे दंडवत. विनंति उपरी. एथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. अलीकडे आपणाकडून पत्र एऊन वर्तमान कळत नाहीं त्यास सविस्तर अर्थ लिहित जाणे. श्रीमंत रावसाहेब देशास आले. त्यांची आपली भेट जाहाली असल्यास सविस्तर वर्तमान लिहून पाठवावें. येथील वर्तमान तपसीलदार कारभाराचें वगैरे राजश्री बाळाजीपंत यांनीं आपणास लिहिलें आहे त्याजवरून कळेल. सारांष जातेसमयीं आपण आह्मांस सांगितले कीं वरीसभरपर्यंत स्वहित३ किंवा अनहित मनास न आणावें त्याजप्रों आपले वचनाचें दृढतर धरून त्याअन्वय आहों. दुसरा मजकूर मातुश्रीबाईकडून४ पत्रें आलीं. त्यांत मजकूर कीं ‘घरीं पंचवीस हजार रुपये खर्च काढून भक्षिले. त्यास कर्जदार ऐवजाची निकड करितात याची तरतूद करून पाठवावें म्हणोन’ त्यास आह्मापाशीं ऐवज आहे किंवा नाहीं आणि येथें तरतूद होती अथवा नाहीं, हा अर्थ सर्व आपणास ठावकाच आहे. याजकारितां हें आपणास लिहिले आहे. तरी आपण पंचवीस हजार रुपये कर्ज मातुश्रीस देवावें. आह्मीं व्याजासुद्धां ऐवज सांगाल तेथें पावते करूं. मुख्य आपणास लिहिल्यावरून ऐवज पावेल हा भरंवसा जाणून लिहिलें आहे; तरी लिहिल्याप्रों कार्य करून उत्तर पाठवावें. वरकड सर्व गोष्टी आपण बोलले आहेत त्याजवरी कायम आहोंत कळावें. रा। छ ११ सफर *मातुश्रीस राहाण्यास जागा पेडगांव द्यावें म्हणून करार होता. परंतु अद्यापीवर तें काम जालें कीं न जालें हें लि।। नाहीं. तर कार्य करून द्यावें म्हनजे कोडथाहून तेथें राहतील. याजकारितां लि। आहे तर हें काम करून द्यावें. परस्थळीं बहुत दिवस राहावें हें विहित न (नै ? ). बहुत काय लि।। हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३८.
इ. स. १७६७ ता. ६ जुलई. श्री. १६८९ आषाढ शुद्ध १०
राजश्री------------------------- का।दार
पा। सिंदखेड गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी सिंदे दंडवत सु।। समान सितैन मया व अलफ पा। मजकूर एथील अम्मल पेशजीचे कमाविसदाराकडून दूर करून सालमजकुरापासून तुम्हांकडे मामलत सांगोन *रसद करार २२००० बावीस हजार करार केले असेत. तरी हाली अम्मल बसलियावरी भरणा करून कबज घेणें. या सों मामलत संबंध कलमें
रसदेचा ऐवज फिटे तोपर्यंत मामलत काढूं नये. कलम १
व्याज येकोत्रा सिरस्ते प्रों मजुरा पडेल १
१आत्फ फितूर मुलूख सिरस्ते सिबंदी २महालमा।र पेशजी
प्रो मजुरा पडेल कलम १ प्रो मजुरा पडेल कलम १
येणेप्रो चार कलमें करार केलें असे तरी इमानेंइतबारें मामलत करून कच्चा हिशेब समजावित जाणें. जाणिजे. छ ९ सफर बहुत काय लिहिणे हे विनंति.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३७.
इ. स. १७६७ ता. ६ जुलई. श्री. १६८९ आषाढ शुद्ध १०
राजश्री---------------------------------------------------------
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी सिंदे दंडवत सु॥ समान सितैन मया व अलफ प॥ शिंदखेड येथील अम्मल तुम्हां-कडून दूर करून सालमजकूरा-पासून राजश्री--------------------- याजकडे सांगितली असे तरी तुम्हीं दिलगिरी (दखलगिरी ?) न करणें. मारनिले अम्मल करतील. प।। मजकूरची ठाणीं असतील तीं यांचे स्वाधीन करून कबज घेणें. जाणिजे छ ९ सफर बहुत काय लिहिणें हे १विनंति.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३६.
इ. स. १७६७ ता. ६ जुलई. श्री. १६८९ आषाढ शुद्ध १०
छ मो अनाम देशमुख व देशपांडे पा। सिदंखेड यांसिः-
केदारजी सिंदे सु।। समान सीतैन मया व अलफ. पा।मजकूरचा अंमल पेशजीचे कमाविसदाराकडून दूर करून साल मजकुरापासून २राजश्री ... ... याजकडे कमाविस सांगितली असे. तरी तुह्मीं मारनिलेसी रुजु होऊन अंमल सुरळीतपणें हरएकविसीं दिकत न करणें. जाणिजे छ ९ सफर मोर्तब सुद
बार