पत्रांक ८२.
१७६४ ता. १६ मे श्री १६८६ वैशाख वद्य १
*राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि--------------------------------
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. उपरी एथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विषेश ( विशेष ? ). ‘पुरंधरेचे२ जुने लोकांनीं आमचें नांव करून दग्यानें किल्ला घेतला’ म्हणोन परस्परें वर्तमान विदित जालें. त्यास हे गोष्ट आम्हांस किमपि ठाऊक नसतां मधीं लबाडी करून कर्म केलें. त्याचें पारपत्याविशीं तीर्थस्वरूपांस लिहिलें आहे. तुम्हीहि विनंति करून लबाडी केली त्यांचें पारपत्य करवणें. वडिलांच्या चित्तांत संशय न ये तें करणें. जाणिजे. छ १८ जिलकाद बहुत काय लिहिणें.