लेखांक १११
१५८६ फाल्गुन शुध्द ६
गोसावी सदानंद
मसुरल हजरती राजश्री कारकुनानि पा। कुडाल प्रति वीरो राम सुभेदार ता जाउली सु॥ खमस सितैन अलफ सदानंद गोसावियाचे धर्मादाउ रयती नि॥ दर गावास गला मण एक आहे ह्मणौउनु गोसावियानी सुभा येउनु मालूम केले तरी सालाबाद भोगवटा पाहोन सालाबादप्रमाणे ताकीद करून देविजे धर्मकृत्य आहे उजूर न करणे छ ३ साबान मोर्तब सूद (शिक्का)
शके १६८६