लेखांक ११८
१५८९ पौष वद्य ७
रुजू + + + (शिक्का)
अज दिवाण ठाणे पा। कर्हाड ता। मोकदमानी मौजे इडमिडे पा। मजकूर सु॥ समान सितैन अलफ मोजेमजकूर कमलनयन सदानद गोसावी याचे इनाम चावर पाऊण मदतकदम चालत आले आहे तरी गोसावी मशारनुलेचे इनामपैकी उचापती न करणे ते हुजूरन खुर्दखत आणितील तेणेप्रमाणे मिसेल सादर होईल मोर्तब (शिक्का)
तेरीख २० माहे रजब