लेखांक ११२
१५८६ फाल्गुन शुध्द ६
श्रीसदानंद
अज सुभा राजश्री परसोडी माहाडिक सुभेदार नामजाद महाछानिहाय ता। मोकदमानी मौजे निगडी किले सातारे बिदानद खमस सितैन अलफ मोजे मजकुरी श्री याचा इनाम आहे त्याच पैकी लाविले आहेत तरी तुमची खंडणी केली आहे ते इनाम खेरीज करून केली आहे तरी तुह्मी याच्या नामास एक जरीयाची तसवीस न देणे तसवीस दिल्ही अगर काही अजार दिल्हीया तुह्मी जाणा ऐसे समजोन अमल करणे पेस्तर फिर्यादी येऊ न देणे मोर्तब सुद (शिक्का)
तेरीख ४ साबान