लेखांक ११९
१५९१ श्रावण वद्य १०
रुजू + + + (शिक्का)
सदानंद मठी
खान अजम सिताबखान सरनाइकवाडी किले सतारा व किलेनहाय ता। बाजी पटेल मोकदम व मोकदमानी मौजे निगडी किले मजकूर सु॥ सबैन अलफ चे इनाम मोजे मजा। बिघे
१५ असेती याबाबे तुह्मास साल दरसाल मिसली सादीर होत असेती की इनामाचे जरा बजरा पावते कीजे आणि तुह्मी हरकत करून इनामाचे जरा बजरा हिसेबुप्रमाणे आदा करीत नाही ऐसे बरे नव्हे इनाम खैरातीचे तुकडा असे व याचे इनामावरी काय पैका कोण बाब कैसे कैसे घेता दखल होत नाहीं आता जरा बजरा पावते कीजे फिर्याद येऊ न दीजे फिर्याद आलीया तुह्मी आपले केले पावाल खैरत नव्हे जाणिजे ताकीद असे मोर्तब (शिक्का)
तेरीख २३ माहे रबिलावल