लेखांक १२०
१५९१ आश्विन वद्य ११
(शिक्का)
अज सुभा पा। वाई ता। मोकदमानि मौजे नीब सा। मा। सु॥ सन सबैन अलफ फकीर मठ सदानंद मालूम केले जे आपले इनामतीपैकी उचाती करिताती ह्मणउनु तरी याचे इनामतीपैके उचाती करणे बाजीत नाही याचे इनामास तसवीस न देणे याची फिर्यादी येऊ ने दणे सालाबादप्रमाणे दुमाला केले असे दुमाला करणे पेस्तर दफतर रुजू मिसेली घेणे मोर्तब (शिक्का)
तेरीख २४ जमादिलोवल