लेखांक १२२
१५९१ कार्तिक वद्य १४
(शिक्का)
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानि दुदेह
मौजे नींब मौजे गोवे
सा। नींब पा। मा। सु॥सन सबैन अलफ बा। खु॥ छ जमादिलाखर पौ। छ २७ जमादिलाखर सादर जाहाले तेथे रजा जे दरीविला गोविंदगिरी गोसावी मुरीद कमलनयन गोसावी हुजूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद दुदेह मजकूर बिता।
मौजे नींब चावर नीम मौजे गोवे चावर नीम
.॥. .॥.
बमोजीब खुर्दखते मोकासाइयानि माजी व कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती सालाबाद चालत आहे हाली कारकून पा। मजकूर नसती इस्कील करून चौथाई बा। पैके घेऊन जाताती साहबी मेहरबान होऊन ताकीद खुर्दवत मर्हामत केले पाहिजे ह्मणौऊन तरी गोसावी मा।इलेस बदल खैरात इनाम दीधला आहे त्यास चौथाईची तोसीस देणे काय माना आहे सदरहू इनामास चौथाई माफ केली असे तो + + + + + भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ जैसे चालिले असेल तेणे (प्र)माणे चालवणे दर हर साल खुर्दखताचा उजूर न करणे तालीक लेहून घेऊन (असल) खु॥ परतून दीजे पा। हूजूर ह्मणऊन रजा रजेबा। अमल कीजे तालीफ लेहून घेऊन असल मिसेली इनामदार मा। परतऊन दीजे मोरतब (शिक्का)
तेरीख २७ माहे जमादिलाखर
जमादिलाखर