लेखांक १३०
१५९३
श्रीदत्त
.॥ श्री दसनाम मानभावा
बहिरवगीर दिगांबर राजेंद्रपुरी दिगंबर
रामेस्वरगिरी दिगंबर गोविंद भारती दिगांबर निर्बाणी
पोकरपुरी मंडीलीक दोरकागीर बोधले
भोवानगीर मंडीलीक शाम परवंत दिगांबर
गंगाबन मलीक मणकंठगीर मेघनाथी
गरीबपुरी दिगंबर दयाहरीपुरी बडे आखाडे
निर्वाण निरंजनी
येणेप्रमाणे दसनाम बालगोपाल मिलोन मठ रााश्री माो मौजे नीबगोवे पा। वाई सु॥ इसने सबैन अलफ येथे आलेयावरी मठामधे मठधारी गोसावी होते ताा
मोहनगीर मनसागीर
आनंदगीर रामचंद्रगीर
येणेप्रमाणे होते तेथे त्यामधे बोलीचाली पाहाता मठीचे कुणबीण बुली होती थिने आपले जीव दिल्हे ऐसे समाचार कलला त्यावरी दसनाम गुरूने मनास आणून भाडारा घेउनु मठपतीयास सेले देउनु मोकलीक केले आता कुणबिणीचे जीव दिल्हे त्याचे काही लिगाडी नाही दसनामानी येउनु अनपाणी घ्याचे यास फुडे कोणी बोलेल त्यास दसनामाचे आण व राजश्री चे आण असे यास बिला हरकत करावयास कोणासी निसबत नाही दसनामाचे हे गोस्टी माफ केले असे पेस्तर जो कोणी बिला हरकत करील तो दसनामाचे गुनेगार वमली कागद सही मठधारी मोहनगीर आहेत त्याचे सेवा मठामधे जे बालगोपाल आहे त्यानी करावी येणे
गोही
तुलोजी पा। सुरियाजी बसराऊ वा
मलजी पा। व माहादजी अभगीराउ
अंताजी पा। नाइकवाडी
(निशाणी नांगर) (निशाणी कट्यार)
भिकोबा कुलकर्णी