लेखांक १२१
१५९१ कार्तिक शुध्द ३
सदानंद
खान अजम सिताबखान सरनाईकवाडी किले सतारा व किलेनहाय ता। मोकदमानि मौजे निगडी किले मजकूर सु॥ सन सबैन अलफ जोगीद्रगिरी गोसावी मोकाम मठ मौजे नीब याचे इनामास हर एक बाबे आजार देता ह्मणे हे काय माना असे हे खैरातीचे टूकडा असे बाजे इनामाबराबरी गोसावीचे इनामास तोसीस न दणे ताकीद असे घडीघडी फिरयाद येऊ न दीजे व सरनाइकीचे पैके जैसे हिसेबी असेल तैसे कीजे बाजे तोसीस लागो न देणे दरीबाब फिरयाद येऊ न दीजे मो। बाजे पटी अगर हर एक पटी आपले गावताफ पाहून घेणे मठाचे इनामास एकजरा तसवीश ने दीजे व फिर्याद येऊ न दीजे (शिक्का)
तेरीख १ जमादिलाखर