लेखांक १२८
१५९३ आश्विन शुध्द ७
सदानंद
(शिक्का)
अजरख्तखान खोदायवद खान अलीशान सिताबखान सरनाइकवाडी किले सतारा व किलेनिहाय ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजे निगडी किलेमजकूर सु॥ सन इहिदे सबैन अलफ जोगीद्रगिरीबावा मोकाम मठ मौजे निंब पा। वाई याचे इनाम मौजे मजकुरी बिघे १५ असेती ऐसीयास त्याचे जैसे सालाबाद साल दरसाल चालत असे त्या मवाफीक चालो दिजे व पेशजी भिस्त रोजी खानमशारनुलेचे ताकीद होती तैसेच चालो दीजे नवी जिकीर न कीजे दरीबाब ताकीद असे बादज फिरयाद येऊ न दीजे जाणिजे सालाबाद चालिलेप्रमाणे दीजे इस्कील न कीजे ताकीद असे (शिक्का)
तेरीख १५ माहे जमादिलाखर