लेखांक १२५
१५९२ कार्तिक शुध्द ७
सदानंद
खान अलीशान सिताबखान सरनाईकवाडी किले सतारा व किलेनहाय ता। हुदेदार व मोकदमानी मौजे वरीये किले मजकूर सु॥ सन इहिदे सबैन अलफ जोगिंद्रगिरी मोकाम मौजे निंब पा। वाई मठ याचे इनाम ता। मौजे मजकूर बिघे
५ असे तरी ऐसीयास जैसे सालाबाद साल दरसाल चालिले असे त्याप्रमाणे चालो दीजे या बाबे पेशजी भिस्त रोजी खानमशारनिलेचेही ताकीद असे त्या मवाफीक चालविजे सालाबाद चालिले असेल त्यास नवी जिकीर न कीजे व इस्काल न कीजे दरी बाब ताकीद असे (शिक्का)
तेरीख ५ माहे जमादिलाखर