लेखांक १३८
१५९८ अधिक श्रावण शुध्द १४
(शिक्का)
अज दिवाण ता। सातारा ता। मोकदम देहाय ता। मजकूर सु॥ सबा सबैन अलफ रा। सदानद गोसावी याचा इनाम गावगना बिाा
१५ मौजे निगडी
१० मौजे देगाऊ
५ मोजे वरये
-------
.।.
एकूण तीस बिघे आहे तो दुमाले करविला आहे बा। सनद सुभा छ २६ रबिलाखर पाद्यै छ १२ जमादिलावल रजे बा। दुमाले करून दरसाला सनदेचा उजूर न करणे तालिक घेऊन असल परतोन दीजे छ १२ माहे जमादिलावल मोर्तबु