लेखांक १३५
१५९७ कार्तिक शुध्द ७
(शिक्का)
(फारसी मजकूर)
अज रखत मसुरल हजरती राजश्री जगदेराऊ नाईक साहेब खुलीदामदौलतहू बजानेब हुदेदारानि वा मोकदमानि मौजे पापरडे ता। मोरगीर मरली बिदानद सु॥ सीत सबैन अलफ अजरामर्हामती इनाम कमलनयनगिरी मानभान भाऊ मठाधिपती श्रीसदानद मुकाम मौजे नींब पा। वाई यास मौजे मा। इनाम जमीन चावर नीम .॥. दीधले असे नखतयाती महसूल व बाजे बाब कुलबाब कुलकानू कदीमपटी व पेस्तरपटी व वेठ बेगारी व फर्मासी व बाजे उजुहाती इनाम फकीराणा अनछत लगर इनाम दीधला असे दुमाले कीजे यासि उजूर न कीजे सदरहू मुसलमान व हिंदू भले सदरहू आपले महजदाची सौगद असे असल खुर्दखत इनामदार मजकुरापासी दीजे तालीक लेहोनु घेउनु इनाम फकीराणा देणे मोर्तब
तेरीख ५ माहे शाबान