लेखांक १३३
१५९६ ज्येष्ठ शुध्द ३
(शिक्का)
आज दिवाण ठाणा ता। सातारे ता। मोकदमानी मोजे वरये ता। मजकूर सु॥ खमस सबैन अलफ छ ७ सफर पैवस्ता छ १ रबिलवल सुभाहून रजा सादर जाली तेथे रजा जे जोगीद्रगीर मानभाऊ जाबती कमलानयन सेकीन सा। निंब यास इनामती जमीन बिघे १५ मौजे मजकुरी सालाबाद भोगवटा चालिला आहे ऐसीयास सालगुदस्ता सदरहू जमीन पडी पडिली होती सालमजकूर इनाम कीर्दीस लावितील तरी लाऊ देणे कीर्दी जालियावरी पेस्तर सनद सादर होईल त्याप्रमाणे आदा करणे तालिक लिहून घेऊन असल परतोन देणे ह्मणऊन रजा सनदेबा। इनाम लावणीस दुमाले केले असे लावणी जालियावरी पेस्तर सनद सादर होईल त्याप्रमाणे अमल करणे तालीक घेऊन असल मिसेल परतोन दीजे मोर्तबु सुद रा।
तेरीख १ माहे रबिलावल
माहे रबिलावल