लेखांक १३६
१५९७ माघ वद्य ६
अज दिवाण सुभा पा। वाई ता। मोकदमानी मौजे गोवे तान्हाजी (पा)टील सा। निंब सु॥ सीन सबैन अलफ मौजे मजकूरपैकी गोसावी यास एक बिघ दिधला आहे आणि तू कथळा करितोस तरी आता त्याचा बिघा त्यास देणे गावपैकीं दिधला आहे ऐसे असता कथला करितोस तरी आजीपासून गोसावी याचे वाटें नव जाणे छ १९ जिलकाद