लेखांक १३४
१५९७ वैशाख वद्य ९
तालिक बा। असल
राजश्री कुकाजी बयाजी हवालदार व कारकून
ता। सातारा गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीराजमान्य स्नेहाकित कृष्णाजी भास्कर सुभेदार व कारकून सुभा महालहाय पा। वाई व सातारा आशिर्वाद व नमस्कार सु॥ खमस सबैन अलफ रो। जोगेद्रगीर मानभाऊ जाबती कमळनैन सेकीन समत निंब यास इनामती जमीन बिघे
१५ पधरा आहे ती त्यास सालाबाद याचे भोगवटा चालत आला आहे त्यास सालगुदस्त जमीन पडत पडली होती साल मजकूर इनाम मजकूर कीर्दीस लावितील तर लाऊ देणे पेस्तर तुह्मास सनद सादर होईल तेणेप्रमाणे अमल करणे तालिक घेऊन असल परतोन देणे रवाना छ ७ सफर मोर्तब (शिक्का) मौजे वरये कीर्द होऊ देणे उजूर न करणे मोर्तब असे (शिक्का)
(शिक्का)