Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ १९ ]

श्री. शके १६४६ ज्येष्ठ शु॥ ६.

राजश्री पिलाजी जाधव गोसावी यासीः-
॥ छ अखंडतलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु॥ खमस अशरैन मया व अलफ. पत्र पाठविलें पावलें. हत्ती आतांच द्यावा ह्मणून लिहिलें, त्यास, द्यावयाचें कांहीं संकट नव्हतें. तो हत्ती त्यांनीच दिल्हा, तेव्हांच चिरंजिवाचे नांवे आह्मीं दिल्हा. त्यांत राजश्री कंठाजी कदम येतील आणि त्यास हत्ती नवाबापासूनच देऊन, ह्मणजे हत्तीही दिल्हासा होतो आणि लौकिकही होतो. आणि हें तुमचे व रा। अंबाजीपंताचे चित्तांत येत नसेल, व रघोजीस तोच पाहिजेसा असला, तरी मग उपाय काय ? जें तुझी उभयता बोललेस तें खरें न करावें तरी काय करावें ? येथें नबाबापासून हत्ती ते आलियावर द्यावासा बोली करून ठेविली आहे. यांत जें विचारें उत्तम दिसेल तें करणें. उद्यां अगर परवां आह्मीहि लष्करास येतो. तुह्मी लोकांस निरोप देतां ह्मणून ऐकलें. त्यास, तुमचे लोक गेलियावर लष्कर कैसें राहेल ? यांत लष्करास निरोप द्यावा ऐसें तुमचे उभयताचे चित्तास आलें असेल, तरी आह्मी आलियावर भलते गोष्टींची वाट काढून निरोप द्यावयाचा. त्यास, ते उठण्यांत विचारास येईल. लष्करचा गाहा न उठे, तें करणें. आह्मी आपले वाईट बुद्धीनें यास भेटलों, करूं नये तें केलें. आतां तुह्मी तरी सारे विचार चितांत आणून येवढें युध्य होई तें करावें. मग पुढें कांहीं तरी होऊं ! उपास अत्रास करूं नये. वेळेस बाहेर शरम राहे तें करावें. एक चुकलें तरी दुसरियानें सावरावें. यांत जें तुह्मांस योग्य तें कराल. सर्व लष्करचा ओढा तुह्मांसच ओढणें लागेल. जाणिजे. छ. ४ जिल्काद. लेखन सीमा.

० श्री ॅ

राजा शाहूनरपतिहर्षनिधान ।
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥

[ १८ ]

श्री. शके १६४६ ज्येष्ट शु॥ २.
राजश्री पिलाजी जाधव गो। :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य

स्नो।  * बाजीराउ बल्लाळ प्रधान आशीर्वादसु॥ खमस अशैरन मया अलफ. पत्र पाठविलें. वर्तमान कळलें जे, तुमचे व राजश्री अंबाजी पंताचे विचारें आलें तें आमचे आलें. तुह्मांखेरीज आह्मी काय आहों ? रु॥ हालींप्रा। आणवणें. बाकी पंधराहजार अश्विन मासीं द्यावें. त्यास, लोकांच्या चिट्या समजाविशीच्या करून त्याचे हवाला रघोजी कदम यांणी घ्यावे. ह्मणजे कांहीं लोकांचीही वाट निघेल. आणि हें जर त्याचे विचारें न येच, तरी कागद त्यांचा भाद्रपदचे मुदतीचा घेणें. तो सावकारास कागद देऊन, वैका घेऊनः हत्तीचा मजकूर तरीः- लिहिल्याप्रमाणें मान्य केलें. राजश्री कंठाजी कदम येथें आलियावरी देऊन. सरंजामाची बोली जे तुह्मी केली असेल, तेणेंप्रमाणें चालवून. परंतु, या समयांत पांच सातशेचे जे फौज येईल तेवढ्यानशीच, परंतु कंठाजी नांवास आलियानें पुरें ! हत्ती ते आलियावर देऊन तुह्मी येविशी दरमियान राहाणें. त्याची निशा करणें. व रुपयेही लौकर येत तें करणें. त्यास, लौकर येत तें करणें. जाणिजे. छ. १ जिल्काद.

० श्री 
राजाशाहुनरप-                 लेखन
तिहर्षनिधान बा-               सीमा.
जिराव मुख्य प्रधान.

 

[ १७ ]

श्री. शक १६४५ आश्विन वद्य ५.
चिरंजीव राजश्री आपा यांसि :-

पिलाजी जाधवराउ आशीर्वाद उपरि क्षेम, आश्विन वद्य ५ गुरुवासर मु॥ नजिक नजिक कावडे, प्रांत खेचिवाडा, यथास्थित असे. यानंतर : तुमच्या पत्रांची उत्तरें जासूदाबा। सविस्तर लेहून पाठविलें आहें, त्यावरून कळेल. तेथून दसरा जाहल्याउपरि कुच करून खेचीचे मुलखांत आलों. बोलीचालीचा निर्गम जाहाला. राजश्री सवाइजीकडील राजामल्ल आले. याचे भिडेनें दुपट्ट जाहाले. हात्ती व घोडे दोन नजर कबूल केलें. विक्रमाजितहि आजि भेटीस येणार. महादेवभट हिंगणे दिल्लीहून आला. पादशाही फर्मान, हात्ती व घोडे दोन जडाव घेऊन आले. वजिराचा मुनशी शिवनाथ आला आहे. पूर्वेकडे जावें; ऐसा मुद्दा त्याचा आहे, कांहीं मदत खर्च कबूल केल्यास. विचारें जाहलें, फाल्गुनमासीं जाणें होईल. येथील मनसबा जाहल्याउपरि अहिरवाड्यांत जाणें होईल. वोडसे, दतिया वगैरे अवघे वकील येथें जमा जाहाले आहेत. बोलीचाली अहिरवाडियांतच निर्गम होईल, तों कार्तिकमास लागेल. तुह्मीहि आळंदीचे यात्रा करून, मार्गशीर्ष शु॥ १ प्रतिपदेस स्वार होऊन, याल, तोंपर्यंत ये प्रांतीच आहों. पुढें जें वर्तमान होईल ते लिहून पाठवून. गणापा नाईक यास देवाज्ञा जाहली. बाबूजी नाईक यासी लि॥ आहे. त्याचें समाधान करून त्याची रवानगी श्रीस करणें. वरकड वर्तमान वरचेवरी लिहित जाऊन. इमारतीचें काम सांगून, येणें. त्याप्रमाणें करतील. उंट सुभानजीला तो अगोदर रवाना केले असतील, ते पावतील. हा आशीर्वाद.

[ १६ ]
श्रीसांव.
शके १६४४.

राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांसि आज्ञा केली ऐसी जे :-

तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. कितेक निष्ठेचे अर्थ लिहिले. ऐशास, येविशीचे कितेक अर्थ बोलणें ते समक्ष बोलावे, ह्मणोन तूह्मांसच हुजूर येण्याची आज्ञा करून, वरचेवरि पत्रें सादर जालीं असतां, अद्यापि येण्याचा विचार दिसत नाही. यावरून काय ह्मणावे ? निष्ठेचे निदर्शन स्वामींस यावें, ह्मणोन तुह्मांस वारंवार लिहिलें; व भेटी सही येण्याची आज्ञा केली असतां, तुल्यांकडून आळस होऊन दिवस घालवितां. येगोष्टीचा विचार तुह्मांजवळच असावा. तुह्मीच उद्योग केल्या अगाध नाहीं. परंतु हैगैनें घडत नाही. दुसरे स्वामीसन्निध उभयपक्षीचे कल राखून चालण्यास एक चांगला योजावा ह्मणोन लिहिलें. त्याचाहि विचार तुह्मींच करावयाचा तोहि न घडला. याजमुळें कितेक राज्यभारसंबंधी कामें तटलीं. तुमचेही प्रत्ययास येऊन त्याची उत्तरे प्रत्युत्तरें तुह्मींच करतां त्याची विस्मृति. तेव्हां तुमचे लक्षांत हे गोष्ट नाहींसें वाटतें. हें कच्चे कप्पे वरचेवर लिहून तुह्मांस जागृत करण्याविशीं स्वामींस आळस नाहीं. व तुह्मी आज कराल, उद्यां कराल, ह्मणोन कालहरणही हुजुरून होत नव्हतें. प्रत्यय तुह्मांस नाहींसा नाहीं. असें असोन, नबाबाकडीलही बोलणी पडलीं याजकरितां सुचविली. तत्रापि तुह्मी कळकळ धरून राज्यभारसंरक्षणार्थ सावधता करावयाची हे सदैव पत्रीं किती लिहावें ? यास्तव एकवेळ तुह्मी येऊन समजोन घेऊन करावें. हें आळस असतां घडत नाहीं हेंच आश्चर्य करितों ! आसो ! कांहीं दिवस एकवेळ समक्ष जाल्या व्यतिरिक्त कोणतेंही कर्तव्य स्वामींस नाहीं. पुढें तुह्मांपासोन घडतच नाहीं असाच निश्चय जाल्या, स्वामींस विचार करणें प्राप्त येईल. तो दिवस अवघड वाटेल ! मग धांवाधांव करूं लागाल, ह्मणोन वारंवार सुचवितों. तुमचे वडिलांनी निष्ठा धरून चालल्या अकल्याण जालें न जालें हें तुह्मीच चित्तांत आणावें. जाणिजे. बहुत लिहिणें तरि सूज्ञ असा.

[१५]

श्री- नकल. शके १६४४ श्रावण शु॥ ७.

आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराउ पंडीत प्रधान ता। पिलाजी जाधव व संभाजी जाधव बिन चांगोजी जाधव, पाटील, निमेमोकेदम मौजे वाघोली, तर्फ हवेली, प्रांत पुणें, सु॥ सन सलास अशरीन मया व अलफ. मौजे मजकूरचे मुक्कामीं तुह्मी येऊन विनंति केली की, आपण गांवाजवळी नवीन तळें जागा पाहोन बांधिलें. थोर तळें जालें. गांवास पाणी नव्हतें तें जालें. तळ्याजवळी बाग करावयाची उमेद धरीत आहों. त्यास, स्वामींनी कृपाळू होऊन आपणांस बाग करावयास मौजे मजकुरी तळ्यासंनिध जमीन आहे, त्यापैकीं कांहीं जमीन इनाम करून देविली पाहिजे. ह्मणून विनंति केली. त्यावरी तुह्मीं तळे बांधिलें. ते दृष्टीने पाहतां, नवीन तळें, गांवसंनिध जागा योजून, श्रमसाहासें टक्कापैकी वेंचून, बहुत मेहनतीनें उत्तम तळें थोर बांधिलें. गांवास पाणी नव्हतें तें पाणी केलें. तुमचा श्रमसाहास देखोन, तुह्मांवरी कृपाळू होऊन, तुह्मांस बाग करावयासी मौजेमजकुरी नूतन इनाम जमीन बाग करावयाची स्थळ हिंगणा माळी, श्रीवाघेश्वर देवाचे पश्चमेस, या स्थळपैकीं जमीन बिघे ३० अराचावर ०।० पाव चावर जमीन इनाम, स्वराज्यदेखिल मोगलाई दुतर्फा कुळबाब हल्लीपट्टी, पेस्तरपट्टी, खेरीज हकदार, इनामदार, इनाम पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने करून दिल्हे आहे. तरी सदरहू जमीन मौजेमजकुरीं स्थलमजकूरपैकी आपले दुमाला घेऊन, बाग करून, इनाम जमीन तु्ह्मीं आपले पुत्रपौत्रादिवंशपरंपरेनें अनुभवीत जाणें. छ० ५ सफर. आज्ञाप्रमाण.

[ १४ ]

श्री. शके १६४२ भाद्रपद शु॥ ७.
• श्री 
राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.

अभयपत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान ता। देशमुख व मोकदम का। सासवड प्रांत पुणें, सुरुसन इहिदे आशरीन मया अलफ. अभय पत्र ऐसें जे. का। मजकुरीं पड़ जमीन आहे. त्यास पावसाळा कौल देऊन आज्ञा केली तर रयत उमेद धरून कीर्दी करितील, ह्मणून विनंती केली. त्याजवरून मामुरी वरी नजर देऊन पड़ जमीन पड़ीचे रकमेस पांच साला पडी दस्त भरून घ्यावे,

k6 009

येणेंप्रमाणें तह करून कौल सादर केला असे. तर सदरहूप्रमाणें चालविलें जाईल. गांवची रयत कीर्दी करील त्यास येणेंप्रमाणे, याखेरीज उपरी कुळ आणून कीर्दी करवाल त्यास पड़ीस एकूणीस मण धारा पांच साला करार केला असे. सदरहूप्रो। चालविलें जाईल. अभय असें. छ० ५ रबिलोवल. आज्ञा प्रमाण.
बार

[ १३ ]

श्री शके १७४१ चैत्र

श्रीमदनंतानंदमंदिर, रमारमणचरणद्वंद्वनिर्द्वंद्व, भजनासादिताशेषपुरुषार्थ, सार्थकिज्ञातात्मीयवंशावतार, समस्तजेगीयमानसकलभूपालहृदयानंदकर, वाग्विलासोदधिसंभूत, यशोनिर्वातमहायोगप्रकाशमान सकलमार्तंडमणीमुकुटालंकारपन्न, श्रीमनमाहासाधूविवेकनिष्ठ वैरागयोगवरिष्ठ परात्पराभिराम, श्री रामदास स्वामी महाराज पूर्णावतारी यांची वंशपरंपरा श्रुत व्हावी येतद्विषई आज्ञा केल्यावरून साकल्य निवेदनार्थ विनंती लिहिली ऐसी जे; मोजे जांब वगैरे खेडीं पांच सात येथील वृती कुलकर्णाची होती. ते वृती सुर्याजीपंत रामदास स्वामीचे तीर्थरूप करीत असतां, आपणास बंधु नाहीं, पूर्व वय, यावनीराज्य, याजकरितां पुत्रसंतानार्थ अराधना श्री सूर्यनारायण याची करूं लागले. तेसमई वय वीस वर्षांचे होते. त्या दिवसापसून भावार्थेकडून पसतिस वर्षांपर्यंत पुढे अनुष्ठान केलें. अन्य दैवत पूजाच करणें नाहीं. असा नियम होत्सातां अंखडीत चालवा. त्यांची स्त्री राणुबाई तीही येकनिष्ठेनींच अराधना सेवन करीत असतां कोणे एके दिवशी प्रत्यक्ष श्री सूर्यनारायण ब्राह्मणवेषरूपें येऊन सूर्याजीपंतास आज्ञा करिते जाले की, श्रीरामनवमी नवरात्र उछवादि भोजनें ब्राह्मणांचीं यथानुक्रमें करून रामउपासना मार्ग चालवावा, येणेंकरून कल्याणावह श्रयस्कर आहे. त्याजवरून सूर्याजीपंती उत्तर केलें की, सूर्यापरितें दुसरें दैवत पुजा ग्रहण करावयाची नाहीं. येको देवो केशवो वा शिवोवा. नारायणाची उपासना करावयाची नाहीं. आपण कोण, तें कळवावें. त्यावरून श्रीनारायण सांगते जाले कीं जी उपासना करितां तोच मी. राम आणि सूर्य दोन नाहीं. येकच. राम सूर्यवंशीचा आहे. उपासना रामनवमी महोत्सवादि सांगितल्याप्रमाणें करणें. तुह्मांस दोन पुत्र होतील. येक माझा अंश व दुसरा हनुमंत अंश अवतारी होईल. याप्रमाणें सांगोन श्री सूर्यनारायण अदृश्य जाले. नंतर कांही दिवसांनी राणुबाई गरोदर होऊन प्रथम पुत्र झाले त्यासमई आनंद महोत्सवादी विशेष करून नामकरणादि संस्कार केले. सूर्याजीपंताचे पंचावन छपन वर्षाचें वय, गंगाधर स्वामीचे जन्मकालाचेसमईं होतें. नंतर पांच सहा वर्षांनी दुसरे पुत्र झाले. त्याचे जन्मकालीं फार आनंद करून नारायण ऐसें नांव ठेवून नामकरण करिते झाले, बारसे विगैरे संस्कार केले. गंगाधरपंताचा वृतबंध करून लग्नही केलें. रामउपासना मार्ग करून उछव करूं लागले. नारायणबोवाचा वृतबंध केल्यानंतर कांहीं दिवसां सूर्याजीपंत समाप्त झाले. गंगाधरबोवा कुलकर्ण करून अराधनामार्गे चालत असतां एके दिवशी रात्रौसमयाच्याठाई यसकर महार याचे वेशें श्री मारुती येऊन गंगाधरपंतास बोलाविलें कीं मायबाप हकमि येऊन देवळांत बसला. पाटलास बोलाविलें ते येतात. तुह्मीं चला. हे ऐकोन चित्तास भय शंका प्राप्त होऊन उठोन देवळाजवळ आले. तो येसकर महार दिसेना हें पाहून घाबरेपणा शरीरीं आला. तो दोन पठाण देवळानजिक बसले ते पाहिले. पठाण उठोन देवळांत गेले. गंगाधरपंतास बोलाविलें. पंत देवळांत गेले. तों पठाण गुप्त झाले. श्री राजाराम दाशरथी व सीता व लक्ष्मण व मारुती प्रत्यक्ष येऊन दर्शन देउन गंगाधरपंतास सावध करून रामनवमी उपासनामार्ग सांगोन चार मुहुर्ती राम, सीता, लक्ष्मण, मारुती दिल्या. आणि ज्ञानमार्गे उपदेश दिल्हा. रामीरामदास नाव ठेविलें. नारायणास उपदेश देऊं ह्मणून बोलोन तात्काल अदृश्य झाले. रामीरामदास स्वामी घरास आले. त्या दिवसापासून आजपर्यंत पूजाउछवादी चाल जी चालत आली ती चाल चालत आहे. नारायणबोवा कांहीं दिवसा थोर झाले. लग्न करावें अशी विवंचना करून बोलत असतां बहुत अनर्थ करावे, रडावें, दडावें, इत्यादि करीत, तेव्हां येके दिवशीं मातुश्री राणूबाईनीं नारायण बोवास येकांती नेऊन सांगितलें कीं लग्न करितो ह्मणतों. तुह्मीं अनर्थ करितां. तेव्हां तुह्मांस पाहणार जे येतात ते वेडे मुल ह्मणतात, याजकरितां शहाणपण धरावें, आंत्रपाठ धरीतोंपर्यंत रडूं नये, संतोषरूप असावें, ह्मणोन सांगितले. न मातुः पर दैवतं, हें वचन शास्त्रवत जाणून मान्य जाले आज्ञेप्रमाणें वर्तो लागले. त्यासमई श्रीरामनवमी उछव दिवस समीप आले, उपासना मार्ग आपणास सांगावा ह्मणून गंगाधर स्वामीस विचारूं लागले. त्याणीं उत्तर केलें, तुह्मांस उपासना मार्ग सांगणार वेगळे आहेत, आह्मीं काय सांगावें ? तें ऐकोन बहुत खिन्न झाले. रुसून गावाबाहेर श्री मारुतीचें देऊळ आहे, तेथें जाऊन निजले. गांवांत जेवणाकरितां, जाण्याची स्थलें होतीं तेथें शोध केला परंतु ठिकाण लागलें नाहीं. फराळ करून घरी निजली. नारायणबुवा देवळांत निजले. मध्यरात्र झाल्यावर श्री मारुती येऊन नारायणबुवास सावध केलें. कां निजला ह्मणून विचारलें. त्यांणीं सकळ वृत्तांत सांगितला. परंतु उत्तम मारुतीनें बोलोन रामचंद्राचें दर्शन करवितों ह्मणोन सांगोन गुप्त झाले. कांहीं वेळ गेल्यावर श्री राम व सीता व लक्ष्मण व मारुती ऐसे उभे राहिले. श्रीचें तेज पाहून नेत्रांस झापड पडती झाली. हें मारुतीनें पाहून नेत्रांस उदग लावून सावध केलें. रामउपासनादि सर्व मार्ग सांगोन उपदेश देऊन, मस्तकी हस्त ठेऊन, रामदास ऐसें नाव ठेविलें, वलकल दिल्हें. तसे वस्त्र मिळत नाही, याजकारितां हुरमुजी भगवें त्या रंगाचे करावें, अशी चाल आहे. ती चाल अद्याप चालत आहे. त्यानंतर लग्नाचा निश्चय करून लग्नपरिवार घेऊन समारंभेकडून गावास गेले, तेथें वधु पूजा वगैरे यांजकडून झालें, तिकडून वराड वर जातांच श्रीमंतपूजन, हरिद्रारोपण, तेलवण, रुखवत, विगैरे इकडील तिकडील परस्परे मुहुर्त होऊन लग्नास वरास घेऊन जाण्यास समारंभे आलें, घेऊन जाऊन मधुपर्कादि याज्ञिक झालें. मंगलाष्टकें ह्मणोन प्रथम सावधान ह्मणताच सावध झालें ह्मणोन निघोन खटाव सेंदरे येथें देवालय होतें त्या स्थळीं गुंफा होती तेथें बसोन अनुष्ठान बारा वर्षेपर्यंत केलें, बारा वर्षे पुढे तीर्थाटन करून ज्या स्थळीं मनुष्यांचा संचार नाहीं, तेथें जावें, बसावें, असे प्रकारें रामदास स्वामी करीत असतां श्री मारुतीने सांगितले जे, तुह्मांस जड देही मनुष्यें हीं अज्ञान, यांस ज्ञानमार्ग लावून वृत्तीवर आणावें याजकरितां श्री रामचंद्राचे उपदेश दिल्हा, असे असोन तुह्मी वनोपवनें हिंडणें चांगलें नाही. ज्ञानमार्ग सांगोन जनास रूढींत आणावें. याजमुळें कृष्णातीरी येणें झालें, ह्मणून दासबोधांत स्वामीचें वाक्य आहे. शिवाजी महाराजास उपदेश होऊन चाफळीं राहणें जालें. परळीस येऊन राहावें. शिवाजी महाराजाकरितां यवनी राज्य परम दुरधर अनीती तें पादाक्रांत करून घेणें. रामदास स्वामीचे आशीर्वादेंकरून फलद्रुप झालें. येविषईची कथा सांगेन, लीहीन, आणि आपणास निवेदन करीन, तरी ग्रंथवत् विस्तार फार वाढेल. याजकरितां कळावें, ध्यानांत यावें, यास्तव सुचनार्थ लिहिलें, वरकड त्यांचे सविस्तर उणार्णव लिहिण्याची शक्ती कोठील ? किती लिहावी ? ऐसे स्वामी अवतारी; त्यांची परंपरा वंशावळें श्रवण करून पुढें स्वामीचें चरित्र श्रवण मनन करावें, ह्मणोन विनंती केल्यावरून बहुत संतोषी होऊन परंपरा आजपर्यंत विस्तार सांगावा, आज्ञा झाल्यावरी रामदास स्वामी ब्रह्मचारी रुद्रावतारी त्यांची संतती नाहीं. त्याचे ज्येष्ठ बंधु गंगाधरबोवा ते रामीरामदास. त्याचे लग्न सूर्याजीपंतानीं केलेंच होतें, त्याचे पोटीं संतती बी तपशीलः--

प्रथम सूर्याजीपंत त्याची स्त्री राणूबाई त्याचे पोटीं

                                                                                   लेखांक १७९

                                                                                                       श्री                                                           १६२१ आश्विन वद्य ५

                                                                                       179 1

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २६ प्रमाथीनाम संवत्सरे आश्विन बहुल पचमी भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणी राजश्री तिमाजी यमाजी देशाधिकारी पा। सातारा यासि आज्ञा केली ऐसी जे सदानंद गोसावी याणी हुजूर येऊन विदित केले की आपला मठ मौजे निंब प्रांत वाई येथे आहे त्यास पुर्वापार इनाम आहे बितपसील जमीन बिघे

निगडी पवाराची येथे बिघे 68१५                                        वरीयेपैकी बिघे 68
मौजे सेदरे पैकी बिघे 68५                                                मौजे वेचले पैकी बिघे 68

येणेप्रमाणे तीस बिघे जमीन पुर्वापर अदलशाहाचे कारकीर्दीपासून इनाम चालत आहे आलाकडे धामधुमीच्या प्रसंगाकरिता बिलाकुसूर इनाम चालत नाही तरी स्वामीने आज्ञा करून सदरहू इनाम बिलाकुसूर चाले ऐसी गोष्ट केली पाहिजे ह्मणून विदित केले त्यावरून हे आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मी हे जाणून सदरहू इनाम गोसावी याच्या मठास अदलशाहाचे कारकीर्दीस चालत आला असेल त्याप्रमाणे हाली पडजमीन याचे स्वाधीन करून इनाम बिलाकुसूर चालवणे या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र गोसावीयाजवळी परतोन देणे जाणिजे लेखनालंकार

                                                                                           179 2

रुजू सुरनिवीस

                                                                                   लेखांक १७८

                                                                                                       श्री                                                           १६२१ आश्विन वद्य ५

                                                                                                                                                                           तालिक

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २६ प्रमाथी नाम संवत्सरे आश्विन बहुल पंचमी भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणी राजश्री (शिक्का) तिमाजी येसाजी देशाधिकारी पा। सातारा यासी आज्ञा केली ऐसी जे सदानंद गोसावी याणी हुजूर येऊन विदित केले की आपला मठ मौजे निंब प्रांत वाई येथे आहे त्यास फुटक दर इनाम आहे बि॥ जमीन बिघे

निगडी पवाराची येथे 68१५                                          वरीये पैकीं बिघे 68
मौजे शेंदरें पौ। बिघे 68५                                             मौजे वेचले पौ। बिघे 6५

येणेप्रो। तीस बिघे जमीन पूर्वापार आदलशाहाचे कारकीर्दीपासून इनाम चालत आला आहे आलीकडे धामधुमीचे प्रसगाकरिता बिलाकुसूर इनाम चालत नाही तरी स्वामीनी आज्ञा करून सदरहू इनाम बिलाकुसूर चाले ऐसी गोष्ट केली पाहिजे ह्मणोन विदित केले त्याजवरून आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मी हे जाणोन सदरहू इनाम गोसावी याचे मठास आहे आदलशाहाचे कारकीर्दीस चालत आला असेल त्याप्रमाणे हली पड जमीन याचे स्वाधीन करून इनाम बिलाकुसूर चालवणे या पत्राची प्रती लेहून घेऊन मुख्य पत्र गोसावी याजवळ देणे जाणिजे लेखन अलंकार मोर्तब

रुजू सुरनिवीस
सुरु सुद बार

[ १२ ] श्री. शके १६३७ चैत्र वा। १३

कायदेमजमदार, वाकेनीस, व कारभारी, व सबनीस, यांचे कोणाचे काय कायदे ? ते हुजुरून आज्ञा करावी, ह्मणोन राजश्री सुलताजीराव निंबाळकर सरलष्कर यांणीं हुजूर लिहिलें. त्याजवरून सदरहू जणाचे कायदेकारभाराचें लेहून पाठविलें. राजपत्र सरलष्कर यांसि जे. छ० २६ जिल्हेज, सु॥ सीत अशर मया व अलफ.

कायदे मजमदार

कारभार करणें तो मजमदा-                सरंजामाच्या सनदा व रोखें
राचे विद्यमानें करावा. का।                  कागदपत्र देणें मजमदाराकडून
१                                                   लिहावे. मजमुचें निशाण जाहा-
पोतें जामदारखाना कोठी-                   ल्यावर शिक्के व्हावे. कलम
रोखे व हुजती व खंडण्याचे कौल १
देणें तो फडणिसानें मजमदाराचे
आज्ञेनें लिहावें. मजमदारांनी
निशाण करून शिक्के घ्यावे.
कलम

कायदे जमेनीस

पोतें जामदारखाना व कोटी                   पोतें जामदारखाना शिलकीवर
येथें जमेनिसाची दखलगिरी                  लाखोटा जमेनिसांनी करावा. का।
असावी. कलम १
१                                                    पैदास्त, जाबितें व खरेदी
पोतें जामदारखाना कोटीवर                 प्रोक्त करावें. तें मजमदारांस
रोखे होतील त्याजवरी मुजमुदा-            दखल करून कागद आपले
रांनीं व कारभारी यांची निशाणें             दस्तुरीं जमेचें निशाण करून
होऊन, शिक्के जाले ह्मणजे जमे-          विल्हें लावावें. कलम
निसांनीं दुसरे जिल्हेकड़े बार १
जमा ह्मणोन निशाण करावें.                हुजला व खंडण्याचा कौल व
मोर्ततबाखालीं देणें ह्मणावें. मज-          मोकासे व इतलाख व वराता देणें,
मदाराकडील लिहिणार आणून            त्याजवरी जमेनिसाचें निशाण बार
वांटणी करावी ये॥. कलम                  जमे ह्मणून व्हावें. कलम
१ १
खंडणी खंडणी होईल तेथें                  बाजारचा हांशील व बसक व
जमेनिसाची दखलगिरी असावी.          जकात देखील जमेनिसाची दखल-
कलम गिरी असावी.                         कलम
१                                                  १

कायदे कारभारी.

पोतें जामदारखाना कोटी                  हुजता खंडणीचा कौल व
येथील रोज जमेस बखैररा होतील       रोखापत्र होईल त्याजवरी मजम-
व रोखे होतील त्याजवर कारभारी       दाराचें निशाण होईल त्यापुढें
यांचे रुजूं व्हावे. कलम १                   रुजूं व्हावें. कलम १

कारभारी सबनीस

जमा सुदगी व बररजाफुरसं-             पोतें जामदारखाना व कोठी-
दगीतैनवरदु करणें तें सबनिसानें        पैकीं वांटणी देणें जाहालें तरी,
मजमुदारास दखल करून तैन          लोकांची गणती सबनिसानें मज-
वरदुबाध व रजाफुरसंदगी वरदु,        मुदारास समजावून, रोखा घेऊन,
याजवरी मजमदार यांचें निशाण         मजमदाराकडील लिहिणार नेउन,
घ्यावें. कलम १                               वांटणी करावी. का। १
                                                  पथकाचे लोकांचे आवरजे
पथकाची गणती याणें घेऊन              घालून पडला आदा बार करून
मजमदारास दखल करावी.               मजमु दप्तरीं बार रुजूं करावें.
कलम १                                        कलम १

एकूण सदरहू प्रों। कायदे आहेत. अशास, सरदारानें कारभार करणें तो मजमूदार, जमेनीस व कारभारी यांचे विद्यमानें करावा. त्यांणी आपला धंदा दंडकप्रमाणें चालवावा. ऐसे थोरलेमाहाराज कैलासवासी स्वामीचे वेळेपासून चालत आहे. तरी तुह्मी जो कारभार करणें तो मजमदार व वांकेनीस व कारभारी यांचे विद्यमानें करीत जाणें, ज्याचा धंदा त्याचे हातें घेत जाणें, ह्मणून सरलष्कर यांस पत्र सादर केलें.