[१५]
श्री- नकल. शके १६४४ श्रावण शु॥ ७.
आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराउ पंडीत प्रधान ता। पिलाजी जाधव व संभाजी जाधव बिन चांगोजी जाधव, पाटील, निमेमोकेदम मौजे वाघोली, तर्फ हवेली, प्रांत पुणें, सु॥ सन सलास अशरीन मया व अलफ. मौजे मजकूरचे मुक्कामीं तुह्मी येऊन विनंति केली की, आपण गांवाजवळी नवीन तळें जागा पाहोन बांधिलें. थोर तळें जालें. गांवास पाणी नव्हतें तें जालें. तळ्याजवळी बाग करावयाची उमेद धरीत आहों. त्यास, स्वामींनी कृपाळू होऊन आपणांस बाग करावयास मौजे मजकुरी तळ्यासंनिध जमीन आहे, त्यापैकीं कांहीं जमीन इनाम करून देविली पाहिजे. ह्मणून विनंति केली. त्यावरी तुह्मीं तळे बांधिलें. ते दृष्टीने पाहतां, नवीन तळें, गांवसंनिध जागा योजून, श्रमसाहासें टक्कापैकी वेंचून, बहुत मेहनतीनें उत्तम तळें थोर बांधिलें. गांवास पाणी नव्हतें तें पाणी केलें. तुमचा श्रमसाहास देखोन, तुह्मांवरी कृपाळू होऊन, तुह्मांस बाग करावयासी मौजेमजकुरी नूतन इनाम जमीन बाग करावयाची स्थळ हिंगणा माळी, श्रीवाघेश्वर देवाचे पश्चमेस, या स्थळपैकीं जमीन बिघे ३० अराचावर ०।० पाव चावर जमीन इनाम, स्वराज्यदेखिल मोगलाई दुतर्फा कुळबाब हल्लीपट्टी, पेस्तरपट्टी, खेरीज हकदार, इनामदार, इनाम पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने करून दिल्हे आहे. तरी सदरहू जमीन मौजेमजकुरीं स्थलमजकूरपैकी आपले दुमाला घेऊन, बाग करून, इनाम जमीन तु्ह्मीं आपले पुत्रपौत्रादिवंशपरंपरेनें अनुभवीत जाणें. छ० ५ सफर. आज्ञाप्रमाण.