Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ११ ]
श्री. शके १६३५ आश्विन शु॥ ३
+ वर्धिष्णुर्वि
क्रमोविष्णोः
सामूर्तिरिव
वामनी || शंभुसुनोरसौमुद्रा
शिवराजस्य राजते
आयपत्र, मा। भांडारग्रह. स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४०, विजयनाम संवत्सरे, आश्विन शुध त्रितीया, भृगुवासरे. क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शाहुछत्रपतिं स्वामी. सु॥ अर्बा अशर मया अलफ. जमाह सरदेशमुखीपैकी बरोबरी नरोजी नाईक जमा ऐवज ऐन रवानगीबरहुकूम, बखैर रुपये.
श्री शाहू ४२५ मोहरा ३४ दर १२॥ श्री
नरपतिहर्ष ७५ रुपये. आईआदिपुरुष
निधान मोरेश्वर ---- श्रीराजाशाहूछत्र
सुत भैरव ५०० पतिस्वामी कृपा
प्रधान निधीतस्यपरशु
राम त्र्यंबक
प्रतिनिधि
पैकीं वजाबाब ।। नुकसान मोहरा, दर आठ आणे
एकूण रुपये १७ बाकी बेरीज रुपये
४०८ मोहरा ३४ दर १२
७५ ऐन रुपये
--------
४८३
यासि आदा जमा नाणेवार
चौतीस मोहरा पाउणशे रुपये
३४ ७५
( रुजु ) मोहरा चौतीस ( रुजु ) मो। रुपये पंचाहातर रास
तेरीख १ रास
रमजान, सु॥ अबो.
बार सुद बार सुरु सुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७७
श्री १६२१ आश्विन वद्य ५
तालिक
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २६ प्रमाथीनाम संवत्सरे आश्विन बहुल पंचमी भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणी राजश्री तिमाजी यमाजी देशाधि(कारी) पा। सातारा यासी आज्ञा केली (शिक्का) ऐसी जे सदानंद गोसावी याणी हुजूर येऊन विदित केले की आपला मठ मौजे निंब प्रा। वाई येथे आहे त्यास पूर्वापर इनाम आहे बितपसील बिघे
निगडी पवाराची बिघे १५ वरीये पौ। बिघे
५
मौजे शेदरे पौ। बिघे ५ मौजे वेचले पौ। बिघे
५
येणेप्रो। तीस बिघे जमीन पूर्वापार आदलशाहाचे कारकीर्दीपासून इनाम चालत आहे आलाकडे धामधुमेच्या प्रसंगाकरितां बिलाकुसूर इनाम चालत नाही तरी स्वामीने आज्ञा करून सदरहू इनाम बिलाकुसूर चाले ऐसी गोष्ट केली पाहिजे ह्मणून विदित केले त्यावरून हे आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मी हे जाणून सदरहू इनाम गोसावी याच्या मठास अदलशाहाचे कारकीर्दीस चालत आला असेल त्याप्रो। हली पड जम याचे स्वाधीन करून इनाम बिलाकुसूर चालवणे या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र गोसावी याजवळ परतोन देणे जाणिजे लेखन अलकार मोर्तब
रुजू सुरनिविसी सुरु सुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[१०] श्री. शके १६३४ श्रावण शुद्ध ३
चिरंजीव राजमान्य राजश्री शाहूराजे यासीः–संभाजीराजे आशीर्वाद उपरि येथील वर्तमान श्रावण शुद्ध तृतीया पर्यंत कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. तुह्मी पत्रें पाठविलीं तीं प्रविष्ट जाहालीं. दिलेंद्राचा पुत्र अलीगोहर यागी होवून आषाढ वद्य द्वादशीस आपणासमीप आला. पाचचार सहस्र फौज समागमें आहे. वजीर वगैरे मातबर सरदार यांची राजकारणेंहि घेऊन आला आहे. जातीनें मर्द, मनसुब्याचे तोडिजोडीस परम दक्ष, तसेंच, औदार्यादिक सर्व गुणेंकरून संपन्न, यवनाधिपत्यास योग्य, असा आहे. परंतु इकडून साध्य झाल्याविना परिणाम नाहीं जाणोन येऊन भेटला. याउपरि येविसीं जसी आज्ञा तसी वर्तणुक करण्यांत येईल; ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळलें. ऐशास, दिलेंद्रास अत्युन्माद होऊन, दक्षणेस येऊन फार अमर्यादाचरण केलें. त्यास कालेंकरून शिक्षा करणें हें ईश्वरासच अगत्य; तदनुसारच होण्याचे परयाय अलीगोहर याचे येण्यांत दिसोन आले. याचें येणें स्वामीच्या महदानंदास कारण जालें. याउपरि अलीगोहर यास, भीष्मपराभवार्थ शिखंडीचा ठाई आदर, त्याप्रो। यास हितावह. परंतु सर्वप्रकारें स्वामीच्या धर्मराज्याची अभिवृद्धि होय, अशी युक्ति योजोन रामचंद्र पंडित अमात्य यासमागमें विस्तारें सांगोन रवाना केलें. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ९ ] श्री. शके १६३०
हिशेब सरदेशमुखी सुहुरसन तिसा मया अलफ. इ॥ छ ७ मोहरम सन समान ता। छ २३ रा।वल एकूण खर्च मुळें जमा व बेरीज. रुपये ९६१२८॥ पौ। वजा शिबंदी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[८] श्रीराम. शके १६३०
यादी रोजमुरा महिना रुपये सु॥ समान.
लोक हजुर चेले.
१३० कोल्हापुरकर ५ १० त्रिंबकजी
२० गुणाजी माहाले ११ जगदेवजी
२० गोपाळजी भाटे ७ विठ्ठल शिरका
१० सटवोजी अनिकडे ७ मलजी मरळ
३० कबुतरखाना ५ ८ मलारजी
१० मोरो आपाजी ८ मलिक खान
१० सिद्दी साद ७॥ येसाजी मिराशी
१३ मिठाईवाले १० रखमाजी शिरका.
७ गोविंद आवटी १० राणोजी
७ सैद मुरीद ४ मालजी भोइटा
१५ जिनगर ३ ८ सैद मिरा
७ खान महमद १२ अवचितराऊ
३० नेचेवाली १० शंकराजी
७ बाळोजी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ७ ]
श्री. शके १६३० चैत्र वद्य ८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वधारीनाम संवत्सरे चैत्र बहुल अष्टमी भृगुवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशाहुछत्रपति स्वामी यांणी राजमान्य राजश्री मोरो प्रल्हाद यासि आज्ञा केली ऐसी जे :-
तुह्मांकडे सरदेशमुखीच्या मामलियास फडणीस पाहिजे. त्यासी, रुद्राजी केशव हुजूर उमेदवार होते. लिहिणार, कामाचे मर्दाने देखोन त्यासि फडणीसीचा कार्यभाग सांगितला असे. याचे हातें फडनीसीची सेवा घेत जाणें. यासी वतन सालीना, देखीलं चोकर, होन पा। ६०० साहासे रास करार केले असेत. इ॥ पैवस्तगीपासून वजावाटाव दंडकप्रमाणें वजा करून उरलें वतन शिरस्ताप्रमाणें पावणें. वतनाचे मोइनप्रमाणें चाकर हाजिर करून लेहवितील, त्या दिवसापासून चाकराचा हक पावीत जाणें. यासी जमान त्रिंबककाकाजी. जमेनिवीस, सुभामानाजी दरेकर, दि॥ राजजी सेनापति, हुजूर घेतला असे. बहुत काय लिहिणें ?
मर्यादेयं
राजते
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[६]
श्री. शके १६२९ चैत्र वा। १४
॥ स्वस्तिश्री माहाराज राजश्री शाहुजी राजे साहेब यांणीं राजश्री रखमाजी कीन्हळे यांस आज्ञा केली ऐसी नेः– स्वामीचा अभ्योदय प्रसंग होऊन या प्रांतीं आगमन झाले. हें ऐकतांच तुह्मी आपले जमावनिसी येऊन लांबकणीचे मुक्कामीं स्वामीसंन्निध हजर जालेस. आपला सेवाधर्म तो केला. त्यावरून स्वामी तुमची एकनिष्ठा जाणोन कृपाळू होऊन तुह्मांस दौलत ला हजारी जात दोनी हजार स्वार मुक्रर केली असे.
सीरस्ता बीता।.
खा. जाती वतन सालीना स्वार देनी हजार सीर
दोन हजार होन २००० स्ता बंदी हजारी
येणेप्रमाणें खा।. जाती सालीना दोनी हजार होन व स्वार सदरहूप्रमाणे मुक्रर कलें असें. सरकारसिरस्ता दंडक प्रमाणें सेवा करून, हक पात जाईल. जाणिजे. छ २१ रबिलावल सु॥ समान मया अलफ.
मर्यादेयं.
विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७६
१६२१ आश्विन वद्य ५
श्री दत्तात्रय सदानंद तालिक
स्वस्तिश्री राज्याभिषक शके २६ प्रमाथीनाम संवत्सरे अश्विन बहुल पंचमी भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती स्वामी याणीं राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान भावी प्रा। वाई यास आज्ञा केली ऐसी जे तपोनिधी सदानंद गोसावी मठ श्री सदानंद वास्तव्य (शिक्का) (शिक्का) का। निंब याणीं हुजूर येऊन विदित श्रीचा इनाम पूर्वापार मौजे उडतर प्रा। कर्हाड येथे जमीन चावर । पाव चावर चालत आला आहे त्यास त्याचे परपरेचे शिष्य तपोनिधी भवानगीर महत आपण आहो त्यावरून मनास आणिता समाधि स्थल जगविख्यात परम रमणी जागा अन्नछत्र भडारे पुण्यतिथी धूपदीप नैवेद्य चालावयाबदल इनाम दिल्हा व भवानगीर महत याणी जिवत समाधी चदीचे मुकामी नवरात्रात नऊ दिवस घेतली परम अनुष्ठानी जाणोन मौजे मा।री पूर्वापार चालत आली जमीन सदरहू प्रा। करार करून दिल्ही तरी या पत्राची प्रती लेहून घेऊन असल पत्र परतोन भोगवयीयास गोसावी यास देणे प्रतिवर्षी नूतर पत्राचा अक्षेप न करणे जाणिजे लेखन अलंकार मोर्तब
रुजु सुरनिसी सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७५
श्री १६२१ आश्विन वद्य ५
तालीक
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके २६ प्रमाथी नाम संवत्सरे आश्विन बहुल पचमी भोमवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणी तिमाजी एमाजी देशाधिकारी पा। सातारा यासि आज्ञा केली ऐसी जे सदानंद गोसावीयाणी हुजूर येऊन विदित केले की आपला मठ मौजे नीब प्रात वाई येथे आहे त्यास पूर्वापर इनाम आहे बितपसील जमीन बिघे
निगडी पवांराची येथे बिघे १५ वरिये पैकी बिघे
५
मौजे सेंबरे पैकी बिघे ५ मौजे वेचवले पैकी बिघे
५
येणेप्रमाणे तीस बिघे जमीन पूर्वापर आदलशाहाचे कारकीर्दीपासून इनाम चालत आहे आलाकडे धामधुमीच्या प्रसगाकरिता बिलाकुसूर इनाम चालत नाही तरी स्वामीने आज्ञा करून सदरहू इनाम बिलाकुसूर चाले ऐसी गोष्ट केली पाहिजे ह्मणून विदित केले त्यावरून हे आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मी हे जाणून सादरहू इनाम गोसावियाच्या मठास आदलशाहाचे कारकीर्दीस चालत आला असेल त्याप्रा। हाली पड जमीन याचे स्वाधीन करून इनाम बिलाकुसूर चालवणे या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्यपत्र गोसावियाजवली परतोन देणे जाणिजे लेखनालंकार मोर्तब
रुजु सुरुनिवीस
सुरु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५ ]
श्री शके १६२४ कार्तिक वद्य ११
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २९ चित्रभानू संवत्सरे कार्तिक बहुल एकादशी सौमवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति यांणीं मुकदमानी कसबे सासवड यासी आज्ञा केली ऐसी जेः- विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. आपणांत व भिवंडीकरांत सीमेचा कथळा लागला आहे. त्याचा निवाडा पूर्वी जाहाला असतां, भिवंडीकर कथळा करावया लागले आहेती. प्रस्तुतः मौजे चामळी, व बांदगाऊ, व भवरी, या तीन गावीचे दांडगे भिवंडीकरांनी मेळवून चालोन येऊन कसबे मजकूरचे लोक दाहा जखमी केले; एक खून केला. ये गोष्टीचें पारपत्य करावया आज्ञा केली पाहिजे, ह्मणोन लिहिलें, ते विदित जालें. ऐशास हाली सदरहू तीनही गावींच्या मुकदमांस हुजूर बोलाविलें आहे. आल्यावरी त्यास जें शासन करणें तें स्वामी करतील. जाणिजे. * * निदेश समक्ष.
श्री ०
शिवनरपति श्रीआई
हर्षनिधान आदिपुरुष श्रीराजा
मोरेश्वरसुत शिवछत्रपति स्वामी मर्यादेयं
नीलकंठ कृपानिधी तस्य परशु- विराजते
प्रधान राम त्र्यंबक प्रतिनिधी