[ १४ ]
श्री. शके १६४२ भाद्रपद शु॥ ७.
• श्री
राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.
अभयपत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराव पंडित प्रधान ता। देशमुख व मोकदम का। सासवड प्रांत पुणें, सुरुसन इहिदे आशरीन मया अलफ. अभय पत्र ऐसें जे. का। मजकुरीं पड़ जमीन आहे. त्यास पावसाळा कौल देऊन आज्ञा केली तर रयत उमेद धरून कीर्दी करितील, ह्मणून विनंती केली. त्याजवरून मामुरी वरी नजर देऊन पड़ जमीन पड़ीचे रकमेस पांच साला पडी दस्त भरून घ्यावे,
येणेंप्रमाणें तह करून कौल सादर केला असे. तर सदरहूप्रमाणें चालविलें जाईल. गांवची रयत कीर्दी करील त्यास येणेंप्रमाणे, याखेरीज उपरी कुळ आणून कीर्दी करवाल त्यास पड़ीस एकूणीस मण धारा पांच साला करार केला असे. सदरहूप्रो। चालविलें जाईल. अभय असें. छ० ५ रबिलोवल. आज्ञा प्रमाण.
बार