Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८१
श्री १६२३ वैशाख वद्य १३
तपोनिधी राजश्री भवानगीर बावा गोसावी मठ श्री सदानंद बावा स्वामीचे सेवेसी
सेवक गिरजोजी यादव दंडवत येथील कुशल जाणऊन आशिर्वादपत्र पाठवावे उपर तुह्मी लिहिले की मौजे इडमिडे हा गाव रो। कैलासवासी स्वामीनी चदीचे मुकामी अनछत्राबदल दिला हा कालपावेतो चालिला आहे त्यास महालचे कारकून नाना दड ताजे ठेऊन रो। माणको गोविंद व रो। आणाजी जनार्दन सुभेदार रोखा करून उपसर्ग देताती ह्मणून लिहिले त्यावरून मातुश्री आईसाहेबास विदित करून राजश्री स्वामीची आज्ञापत्रे आणणार आहेत त्यावरून कळो येईल वरकड तुमच्या कार्यास अतर पडणार नाही बहुत लिहिणे नलगे छ २६ जिल्हेज हे विनंती
इरमाडे जमीन चावर .।.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३६ ]
श्री. शके १६५० माघ वा। ३.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसी :--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। बाळाजी विश्वनाथ आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुषल लेखन करणे. विशेष. तुह्मांकडे हुजूरचा दरमाहेचा ऐवज सरदेशमुखीचा येणें आहे. त्यापैकीं विद्यमान राजश्री राघोपंत रुपये १९८० एकुणसेऐशी पाठविले. त्यापैकीं वजा बहुडा रुपये २० वीस. बाकी जमा पोता रुपये १९६० एकुणसेसाठी, जमा जाले असेत. फाल्गुणमासाचा हप्तापैकी पावले असते. जाणिजे. छ० १७ रज्ज़ब सु॥ तिसा अशरीन मया अलफ. बहुत काय लिहिणें.
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३५ ]
श्री. शके १६६० आश्विन शु॥ १४.
राजमान्य राजश्री जगन्नाथ नाईक पुरंदरे गोसावी यांसि :--
अखंडितलक्ष्मीअलंकृत
स्नो। पिलाजी जाधवराउ दंडवत. सुहुरसन तिसा अशरीन मया अलफ. राजश्री पंतप्रधान यांणी आपणांकडे रुपये ५,००० पांच हजार सरदेशमुखीचेऐवजी देविले आहेत. ते अखेरसालीं पाऊन. जाणिजे. छ० १२ रबिलोवल. + फष.
श्रीशिवराज मोर्तब
चरणीं दृढभाव ॥ चांगोजी- सूद.
सुत पिलाजी जाधव ॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३५ ]
श्री. शके १६६० आश्विन शु॥ १४.
राजमान्य राजश्री जगन्नाथ नाईक पुरंदरे गोसावी यांसि :--
अखंडितलक्ष्मीअलंकृत
स्नो। पिलाजी जाधवराउ दंडवत. सुहुरसन तिसा अशरीन मया अलफ. राजश्री पंतप्रधान यांणी आपणांकडे रुपये ५,००० पांच हजार सरदेशमुखीचेऐवजी देविले आहेत. ते अखेरसालीं पाऊन. जाणिजे. छ० १२ रबिलोवल. + फष.
श्रीशिवराज मोर्तब
चरणीं दृढभाव ॥ चांगोजी- सूद.
सुत पिलाजी जाधव ॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३४ ]
श्री. शके १६५० आश्विन शु॥ ६.
राजश्री सटवाजी जाधव गोसावी यासी :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सुरसन तिसा अशरीन मया आलफ. तुह्मांकडे मामला बाबती सरदेशमुखी बाबत सरंजाम रा। पिलाजी जाधवराउ याचा आहे. तेथील सालमजकूरचे रसदेचा ऐवज येणें, त्यापैकी गु॥ शामजी सोनार.
५० ऐन जमा पोता रोख आणून दिल्हे.
५० बाबत ऐवज पेठ व वासदे वगैरे येथील मख्ता
रुपये १७५० पौ। जाजती आले ते. या ऐवजी
मजुरा दिले पन्नास.
----------
१००
एकूण एकशें रुपये रास जमा जाले. मजुरा असत. जाणिजे. छ. ४ राबलावल. लेखन सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाळाजी बाजीराव मुख्य प्रधान. * *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[३३]
श्री.
शके १६५० आश्विन शु॥ ५.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो बाजीराऊ बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सुमा तिसा अशरीन मया अलफ. तुह्माकडील मामलाबाबती सरदेशमुखीचा आहे. फुलबरी वगैरे पौ। बद्दल देणें रदकर्ज, राजश्री अंतोबा नाईक भिडे यांस रुपये २०,००० वीस हजार देविले असेत. पावते करणें. जाणिजे. छ० ३ रबिलोवल + बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा
* ० श्री ॅ
राजा शाहूनरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२ ]
श्री शके १६५०, भाद्रपद शु॥ ५. मा। अनाम देशमुख व मोकदम व देशकुलकर्णी का। सासवड यांसिः–
नारो शंकर सचीव सुहूरसंन तिसा अशरैन मया अलफ. राजश्री अंबाजी त्र्यंबक कुलकर्णी कसबे मजकूर व देशकुलकर्णी कर्यात मजकूर यांणीं हजूर किले सिंहगडच्या मुकामी येऊन विनंति केली जेः- कसबे मजकूरची मोजणी रा। गोपजीपंत यांणीं पेशजी केली. ती जबर जाली. याकरिता रयतीनें दहशत घेऊन कीर्दी करावयास उमेदवार होत नाही. याकरितां हाली कीर्दीवरी नजर देऊन कसबे मजकूरची रास्ती मोजणी दोरीनें पांचाचे पांच हात व एक घोडेमूट याप्रमाणें दोरी करून जमीन मोजणी केलिया उमेदीनें लावणी होईल. ह्मणून विनंति केली. त्यावरून हें पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी तुह्मीं, व मख्तेसर थळकरी कुणबी-कसबा मजकूरचे- बरोबर घेऊन, हुजूर येणें. हुजरून कारकून देऊन रास्ती मोजणी करून, अभय दिल्हें जाईल. जाणिजे. छ० ३ सफर. पा। हुजूर.
श्री पत्रावधि
शंकराजी रयंभाति
नारायण
बार सुरु सुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३१ ]
श्री शके १६५० श्रावण वा। ९.
० श्री ॅ
राजशाहू नरप-
ति हर्षनिधान बा-
जीरावबल्लाळ
मुख्य प्रधान t
आज्ञापत्र राजश्री पंडत बाजीराव श्रीमुख्यप्रधान ता। जमीदार कसबे संबळगड संवत १७८४ के सालगुदस्तकी षंडिणीके रुपया
१९७५॥ एकुणीस सो साडेपंच्याहत्तर रुपया बाकी थी. सो तमारे नादारीपर नजर देकर तुमारे ते छोडदिया रुपया ९७५॥ नवसो साडेपचाहत्तर सोडीदिया. बाकी रुपया १००० एक हजार करारकीया. सो वसुल देकर खुशाल रहियो. जाणिजे. छ० २३ मोहरम. आज्ञाप्रमाण.
लेखन
सीमा
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३० ]
श्री शके १६५० श्रावण वा। १.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासी.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु॥ तिसा अशरीन मया अलफ. सालगुदस्ताचे बाकीचे ऐवजी रुपये ३०० तीनशे, गु॥ शामजी सोनार, पोता जमा जाले. मजुरा असेत. सालगुदस्ताचे तुह्मांकडील माहालींच्याऐवजी पावले. जाणिजे. छ० १४ मोहरम. बहुत काय लिहिणें ?
० श्री ँ लेखन सीमा.
राजाशाहू नरपति हर्षनिधान
+ बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९ ]
श्री. शके १६५० आषाढ वा। ११
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीरावबल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु॥ तिसो अशरीन मया अलफ. सालगुदस्ताचे बाकीचे ऐवजीं गु॥ शामजी सोनार, रुपये १००० हजार रुपये जमा पोता जाले. मजुरा असेत. छ. २४ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ! लेखन सीमा.
० श्री ँ
* राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.