[ १८ ]
श्री. शके १६४६ ज्येष्ट शु॥ २.
राजश्री पिलाजी जाधव गो। :- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। * बाजीराउ बल्लाळ प्रधान आशीर्वादसु॥ खमस अशैरन मया अलफ. पत्र पाठविलें. वर्तमान कळलें जे, तुमचे व राजश्री अंबाजी पंताचे विचारें आलें तें आमचे आलें. तुह्मांखेरीज आह्मी काय आहों ? रु॥ हालींप्रा। आणवणें. बाकी पंधराहजार अश्विन मासीं द्यावें. त्यास, लोकांच्या चिट्या समजाविशीच्या करून त्याचे हवाला रघोजी कदम यांणी घ्यावे. ह्मणजे कांहीं लोकांचीही वाट निघेल. आणि हें जर त्याचे विचारें न येच, तरी कागद त्यांचा भाद्रपदचे मुदतीचा घेणें. तो सावकारास कागद देऊन, वैका घेऊनः हत्तीचा मजकूर तरीः- लिहिल्याप्रमाणें मान्य केलें. राजश्री कंठाजी कदम येथें आलियावरी देऊन. सरंजामाची बोली जे तुह्मी केली असेल, तेणेंप्रमाणें चालवून. परंतु, या समयांत पांच सातशेचे जे फौज येईल तेवढ्यानशीच, परंतु कंठाजी नांवास आलियानें पुरें ! हत्ती ते आलियावर देऊन तुह्मी येविशी दरमियान राहाणें. त्याची निशा करणें. व रुपयेही लौकर येत तें करणें. त्यास, लौकर येत तें करणें. जाणिजे. छ. १ जिल्काद.
० श्री
राजाशाहुनरप- लेखन
तिहर्षनिधान बा- सीमा.
जिराव मुख्य प्रधान.