Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५४ ]
श्री. शके १६५२ श्रावण वा। ८.
राजेश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसिः-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मोरशेट करंजे रामराम विनंति उपरि. तुह्मी चिरंजीव घनश्याम यापाशी रुपये २,००० दोन हजार दिल्हे ते आपणास पावले. श्रावण व. ८ शके १६५२ साधार(ण) नाम संवत्सरेस पावले. + बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९३
श्री १६२५ चैत्र वद्य १२
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २९ सुभानु संवत्सरे चैत्र बहुल द्वादशी मदवासर क्षत्रिय कुलावातंस श्री राजा शिव छत्रपती याणीं मोकदमानी मौजे इडमिडे तर्फ हवेली प्रां। वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौ। मजकूर राजश्री भवानगिरी गोसावी यास इनाम आहे त्यास गोसावी यानी गुदस्ताची बाकी नस्ती काहाडून वसुलाचे तोष्ट लाविले आहे तरी स्वामीनी पारपत्य करावया आज्ञा जाली पाहिजे ह्मणून तुह्मी येऊन हुजूर विदित केले त्यावरून मौजेमजकुरचा हिशेब मनास आणावयाविशी स्वामीनी राजश्री जगजीवन नारायण देशाधिकारी प्रा। वाई यास आज्ञा केली आहे ते रास्ती हिशेब तुमचा मनास आणून हिशेबी जे बाकी निघेल तो ऐवज झाडीयानसी गोसावी याकडे पाववणे व सालमजकूरचे खडणीचा ऐवज सारा गोसावी याकडे पावता करणे पुढे गोसावी याचे रजा तलब वर्तोन कीर्दी मामुरी करून रास्ती गावीचा ऐवज त्याकडे पाववीत जाणे खलेल एकजरा न करणे तुह्मास जाजती काही आजार लागणार नाही जाणिजे निदेश समक्ष
सुरुसुद बार
रुजु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५३ ]
श्री. शके १६५२ श्रावण शु॥ ५.
राजश्री हरिदीक्षित उपनाम मनोहर गोत्र भारद्वाज सूत्र हिरण्यकेशी प्राचीन वास्तव्य पंचनदी प्रांत दाभोळ हालीं वास्तव्य कसबे कल्याण स्वामीचे सेवेसीः-
स्वस्तिश्री शालिवानशके १६५२ साधारणनाम संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी गुरुवासरे तद्दिनीं लिखिते राजीनामा सरदेशाई व देशमुख व देशपांडिये मोकदम व शेटे महाजन व ह्मात्रे व खोत पाटील व रयत परगणात प्रा। फिरंगण वसई बहादरपूरः
१ पा सायवान. १ पा। आठगांव अणजोर १ पा। मालाण महाल
व ता। हे.
१ पा। सासठ. १ पा। मनोर. १ पा। माहीम.
१ पा। माहा. १ पा। तारापूर. १ पा। कालाण.
१ पा। खैरणे व पा। १ पा। अशेरी. १ कसबे दवण.
पांचनद बेलापूर.
श्री. शके १६५२ श्रावण शुद्ध ५.
सु॥ इहिदे सलासीन मया अलफ. कारणें. वेदशास्त्रसंपन्न राजमान्य यांसी राजीनामा लेहून दिल्हा ऐसा जे :– स्वामींनीं श्रीमहास्थळीं सोमयोग केला. तो आपण दृष्टीनें अवलोकून, परम संतोष पावोन, हेतपूर्वक निश्चय केला कीं, ऐसा स्वधर्म आपल्या मुलकांत व्हावा, आणि ऐसे सुपात्र ब्राह्मण स्नानसंध्यादि षट्कर्मे आचरोन, महायज्ञ करितात, यांस आपण गांवगन्ना वर्षासन करून देऊन, धर्मवृद्धि करावी. तेणेकरून पातक नाशातें पावोन, सुखोत्पत्तीनें पावन होऊन, ह्मणोन काया वाङमनसा निश्चय केला होता. तदनुसार होऊन आलें. त्यावरून स्वामींस आत्मसंतोषें दरगावास रुपया १ प्रमाणें धर्मादायाची वृत्ती पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें करून दिधली असे. तरी स्वामींनीं साल दरसाल वृत्ती अनभवीत जाणें. यासी कोण्ही अंतराय करणार नाहीं. जो अंतर करील तो आपले स्वधर्मास पराङ्मुख होऊन पूर्वजसहवर्तमान अधःपातास जाईल. हा राजीनामा लेहून दिल्हा सही छ. ४ मोहरम.
प्रा। पांचनद.
१ बाळ पा। व नाम १ तानठाकूर मौजे १ सेतू पा। मौजे देशई.
पा। मौजे बांवावली. डोंबोली. १ मुग पा। मौजे डावलें.
१ धाग पा। मौजे १ बाळ ह्मात्रा व नाम १ बापू पा। मौजे कवसें.
ह्मताडीं. ह्मात्रा मौजे ठाकुर्डी. १ नाग पा। मौजे
१ मूड पा। मौजे दिवें. १ राघ ह्मात्रा मौजे सांगावे.
१ धाग ह्मात्रा मौजे कोपर. १ पोस ह्मात्रा मौजे
मुंबरें. १ चाहू ह्मात्रा मौजे हेतुठण.
१ बाळ ह्मात्रा मौजे निळोंजें. १ घार ह्मात्रा मौजे
येईरपार्डी. १ चाहू ह्मात्रा मौजे घारिवली.
१ चांग पा। मौजे दोतोंडें. १ भीक भौ॥ मौजे
डायघर. १ गण ह्मात्रा मौजे कुमरली.
१ आळ पा॥ मौजे उ- पीडखाली. १ आळ चौधरी मौजे
सरघर. चोळे.
१ डाय पा। मौजे
अगासन.
प्रा। सायवान.
१ नाव पा। मौजे अडणें.
१ बांग पा। मौजे भाताणें.
१ बाळ ह्मात्रा मौजे नवसें.
१ धर्म पा। मौजे माटुंगें.
प्रा। कामणखांच.
१ लक्षमणजी पा। का। कामण. १ उद्धव पाटील मौजे बिचोटी
१ बाळ पा। मौजे सारजे. ता। काल्हाण.
१ भीम पा। मौजे ठेणी ता। नवघर. १ तान पा। मौजे कोल्ही.
१ बाळ पा। मौजे चेंदरें. १ आत्माजी पा। मौजे देउदळ.
१ पोस पा। मौजे बापाणें.
१ हर पा। मौजे राजावळी.
१ धाग पा। मौजे नवघर.
१ ह्माद पा। मौजे सउद र्ता। नवघर.
१ ह्माद पा। मौजे करनाळें ता। नवघर.
१ ह्माद पा। मौजे ठेणी ता। नवघर.
१ वीठ पा। मौजे सोलोडे ता। नवघर.
१ पद चौधरी मौजे पोह्मण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५२ ]
श्रीराम.
शके १६५२ वैशाख.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दादोबा स्वामी गोसावी यांसिः-
पोष्य नारोराम नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन केलें पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. लिहिला अभिप्राय कळों आला. ऐशास, तुमच्या पत्रापूर्वी राजश्री स्वामींस राजश्री पिलाजी जाधवराव यांची पत्रें आलीं जे, आपणांस राजपुरीहून पत्रें आली, त्यावरून स्वार होऊन जातों, येविशीं आज्ञा काय ? ह्मणोन. त्याचीं उत्तरें पाठविली जे, तुह्मी जमाव घेऊन जाणें. ह्मणून ती पत्रें पावलियावारि, ते स्वार होऊन जातील, तरी उत्तमच; नाहीं तरी, त्यांची रवानगी तिकडे करून दिल्ही पाहिजे. राजश्री चिमाजीपंत यांच्या शरीरी समाधान वाटल्यानंतर ते येतील. दरबारी कोणी माणूस तुह्मांकडील नाहीं. याकरितां तुह्मी स्वार होऊन येणें. येविशीं राजश्री स्वामीचीही पत्रें मागाहून पाठवून देऊं. बहुत काय लिहिणें ? + लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५१ ]
श्री. शके १६५२ चैत्र शुद्ध ४.
राजे चिमणाजी बावा गोसावी यांसिः-
विनंति उपरि येथील क्षेम ता। छ० २ रमजान बुधवारपर्यंत यथास्थित असे. यानंतर श्रीमंत महाराज राजश्री शंभुछत्रपति आजि रात्रौ कृष्णापार व्होऊन सप्तरुषीस गेले आहेत. तर, तुह्मीं बहुत खबरदार असली पाहिजे. श्रीमंत राजश्री दादोबा यांचे घरीं गेले आहेत. गडचा कुली सुलाक त्याकडे जाला आहे. + तर पत्रदर्शनीं श्रीमंत पंतप्रधान याकडे पत्र रवाना करणें. व रा। अंताजी शिवदेव फौजसुद्धां आले आहेत. यास राखुन असली पाहिजे. पुढें येऊं न देणें. कुली सरकारकुन व गडकरी देखिल सप्तऋषी गड आह्मी भेदले आहेत. तर तुह्मी बहुत प्रकारें सावध राहून त्यांस राखिलें पाहिजे. पत्र वाचून फाडून टाकिलें पाहिजे. बहुत काय लिहणें ? कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ५० ]
श्री.
शके १६५२.
कैलासवासी थोरले अजोबा साहेबाचे कारकीर्दीपासून ते सेखोजी बावापावेतों इकडील तर्फेस इनाम गांव चाकर लोकांसः-
थोरले अजोबासाहेबीं:-
१ खंडो गोविंद मजमदार मौजे दामाजी पिलाजी मौजे चोण
मंगरूळ तर्फ पेण. नेरळ.
१ बावाजी खानवीलकर मो। कल्याण प्रांतीं लेले शिष्ट
नरसापूर. थोर यांशीं दोन इनाम.
येणेंप्रमाणें. पैकी खंडो गोविंद व दामाजी पिलाजीस निरोप दिल्हा. गेले. खंडो गोविंद महाराजाकडेस जाऊन सुभे मामले केले. परंतु इनाम गांव अजोबा साहेबी चालविले. ते अद्यापि श्रीमंतांचा अंमल जाला तरी चालत आहेत. सेखोजी बावांनीं महादाजी कृष्णास मौजे भादाणें तर्फ खोनाळें सुभा भिवंडी इनाम दिल्हा तो अद्यापि चालतच आहे.
कैलासवासी दिवाण खासे साहेबीं.
मल्हारजी हवालदारांनी कुला- रामाजी सरसबनवीस यांनी
बेयाचे राजकारण करून दि- तुळाजीपंती देखील कुलाबा
ल्हें. गांवची कबुलात होती बळावून राहिले. त्यासमयीं
त्याप्रमाणें मौजे भाल दिल्हे. खाशाजवळ लोक नव्हते. संक-
परंतु मोईनींत चालविलें. १ ट पडलें. रामाजी बावा थळास
खासे रेवदंडियांत निघोन मोर्चेयावरून आज्ञा जातांच
जातां पांचशे माणसांनशीं आले.
युक्तीनें खाशांनी आंत घेऊन
तुळाजीपंतांस बंद केलें. लोक
धरिले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४९ ]
श्री.
शके १६५२.
राजश्री पिलाजी जाधवराउ गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। दावलजीराव सोमवंशी सरलष्कर रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन कीजे. विशेष. आह्मी राजश्री पंतप्रधान यांस तुमचेविशीं बहुतप्रकारें सांगेन पूर्ववतप्रमाणें तुमचा मामला तुमचे स्वाधीन करविला. ऐशास, सांप्रत आपण कोठें आहेत, वाघोलीस आहेत, किंवा कोणते ठिकाणीं आहांत ? हें सविस्तर वर्तमान लिहिलें पाहिजे. निरंतर पत्र पाठवून कुशल वर्तमान लिहित गेलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
० ॅ
श्रीराजा शाहुछ-
त्रपतिस्वामिचरणि मोर्तब
तत्पर दावलजी सूद.
सोमोसी सरलस्कर
निरंतर.
सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४८ ]
श्री.
शके १६५१.
उभयतां चिरंजिवांस आशीर्वाद. उपरि. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. वर्तमान विदित जालें. ऐसियासी, या काळाप्रमाणें जें होतें तें उत्तमच आहे. बिघडली बाजी फिरून नीट व्हावी, हें ईश्वराचे इच्छेवरी आहे. होणें तें समयीं होईल. तुह्मां दोघांचवघांवरी निकर्ष फारच केला, तो ध्यानांत आहे. या समयांत तुमचें नीट करून द्यावें तरी तुमच्या खावंदाचें व आमचें स्वरूप कितीकसें राहिलें आहे ? तें कळतच आहे ! अधिक उणी गोष्ट तेथें सांगायासी गेल्यानें रुचणार नाहीं. दौलतीची वगैरे काळजी तुह्मीं कशास करितां ? राहिली नाही हें आह्मांसहि कळतें; परंतु, या काळांत कोणेहि गोष्टीचा इलाज चालत नाही. तुमच्या आमच्या मनोदयानुरूप घडून येणार असेल तें समयीं येईल. चिरंजीवहि या समयास उचित तेंच करितात. एखादी गोष्ट लेंकूरपणामुळें चुकत असतील. त्यांस येथून लिहितां येत नाही. + आमची पत्रें तुह्मांस जातील तितकीं शपथपूर्वक फाडून टाकीत जाणें. नवलविशेष आढळलेलें वर्तमान वरचेवरी लिहित जाणें. बहुत काय लिहिणें ! हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४७ ]
श्रीशंकर.
शके १६५१.
श्रीमत्परमहंसादियथोक्तबिरुदांकितशृंगेरीसिंहासनाधीश्वरश्रीमच्छंकराचार्यान्वयसंजाताभिनवश्रीविद्याशंकरभारतीस्वामीकरकमलसंजाताभिनवश्रीविद्या नरसिंहभारतीस्वामीकृतनारायणस्मरणानि :-
स्वस्ति श्रीमतसकलगुणालंकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री अंबाजी त्रिंबक परमभक्तोत्तम यांप्रतिः-- विशेषस्तु. तुमचें कल्याण इच्छित करवीरक्षेत्रीं छात्रसभासमवेत श्री पाशीं राहिलों असों. तदनंतर, आपण प्रत्योत्तर व मठनि॥ ग्रामास अभयपत्रें पाठविली, त्यावरून बहुत समाधान पावलों. तुह्मासारिखे अभिमानी सत्शिष्य असतां आह्मांस कोणे गोष्टीची चिंता काय ? हें संस्थान तुह्मां सद्भक्तांचे आहे. जो परामर्ष कराल तो ईश्वरार्पण होऊन उत्तरोत्तर श्रेयस्कर आहे. खेडेस रक्षपाळ देऊन संरक्षण तुह्मी करालच. परंतु सांप्रत याप्रांतीचे अधिकारी खंडन करिताती, ह्मणोन कळलें. त्यास, नकळत महीची खेडी एकत्र करितील, आणि पैकेचा तगादा लावतील, याकरितां पूर्वसूचना कळावी ह्मणोन लिहिलें असे. खंडणीकरितां समईं महीचे ग्राम वजा करून बोली केली पाहिजे. ह्मणजे निरोपद्रव होईल. नाहीं तरी आपणास संकट पडेल. ऐसियासि, आमचे गांव निराळे करून बोली चुकवणार सत्शिष्य असा. सांप्रत पुण्यतिथीही समीप उरली. त्याचे साहित्यें आपणाविरहित करणार कोण आहे ? वरकड अर्थ रा। बाबदेभट व हरीभट मुद्दा सांगतील त्यांवरून सविस्तर कळेल. दर्शनांतीं सर्व वृत्त निवेदन करूं. सुज्ञांप्रति बहुत लिहिणें नलगे.
लेखना
वधि.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १९२
श्री १६२५ चैत्र वद्य ११
छत्रपती
राजश्री नारो राम हवालदार व कारकून वर्तमान व भावी सा। बारामुर्हे गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक विठल गोपाळ सुभेदार व कारकून सुभा जाउली नमस्कार सु॥ सलास मया अलफ बा। सनद राजश्री स्वामी शक २९ सुभानुनाम संवत्सरे चैत्र बहुल सप्तमी रविवासर पो। छ २४ जिलकाद सादर जाले तेथे आज्ञा की कृष्णागिरी गोसावी लदेसगिरी गोसावी याचे शिष्य वस्ती मौजे धाडेघर याणी हुजूर स्वामीसनिध घेऊनु विनंती केली की लदेसगिरी गोसावी आपले गुरू यास थोरले राजश्री कैलासवासी स्वामी याणी तांदुळ कैली कोठी मापे .। पांच मण धर्मादाऊ दिल्हा होता तेणेप्रमाणे ता। राजश्री संभाजी राजे याचे कारकीर्दी पावेतो चालत आले त्याउपरी सन तिसा मधे लदेसगिरी आपले गुरु याणी समाधी घेतली अशास आपण मठी वास्तव्य करून आहे तरी स्वामीने कृपाळू होऊनु लदेसगिरी यास पाच मण तांदूळ धर्मादाऊ दिल्हा होता तो आपणास चाले ऐसा करून सनद ल्यावयास आज्ञा केली पाहिजे ह्मणौन विदित केले व देशमुख ता। मा।र याची बखैर आणिली त्यावरून मनास आणिता कृष्णगिरी गोसावी भले महताचे शिष्य मठी वास्तव्य करीत आहेत याची स्वस्ता जाली पाहिजे याकरिता स्वामीने कृपाळु होऊनु यास तांदूळ कैली कोठी मापे .।. पांच मण सालीना द्यावयाची आज्ञा केली आहे तरी तुह्मी गोसावी याचे प्रतिवरषी परामर्ष करून पाच मण तादूळ कोठी मापे साल दरसाल स्वस्ती क्षेम असतील तोवरी पावीत जाणे प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप करीत नव जाणे या पत्राची प्रती लिहून घेऊनु असलपत्र भोगवटीयास गोसावी याजपाशी परतोन देणे ह्मणौन येणेप्रमाणे हुजरुन आज्ञापत्र सादर जाले त्यावरून सुभाहून तुह्मास सनद सादर केली असे तरी जोवरी गोसावी स्वस्तीक्षेम असेल तोवरी परामर्ष करून साल दरसाल सरदहूप्रमाणे पावीत जाणे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राचे तालिक लिहून घेऊनु असलपत्र भोगवटीयास कृष्णागिरी गोसावी याजपाशी देणे जाणिजे छ २४ जिलकाद मोर्तब सुद