लेखांक १७८
श्री १६२१ आश्विन वद्य ५
तालिक
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २६ प्रमाथी नाम संवत्सरे आश्विन बहुल पंचमी भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणी राजश्री (शिक्का) तिमाजी येसाजी देशाधिकारी पा। सातारा यासी आज्ञा केली ऐसी जे सदानंद गोसावी याणी हुजूर येऊन विदित केले की आपला मठ मौजे निंब प्रांत वाई येथे आहे त्यास फुटक दर इनाम आहे बि॥ जमीन बिघे
निगडी पवाराची येथे १५ वरीये पैकीं बिघे
५
मौजे शेंदरें पौ। बिघे ५ मौजे वेचले पौ। बिघे 6५
येणेप्रो। तीस बिघे जमीन पूर्वापार आदलशाहाचे कारकीर्दीपासून इनाम चालत आला आहे आलीकडे धामधुमीचे प्रसगाकरिता बिलाकुसूर इनाम चालत नाही तरी स्वामीनी आज्ञा करून सदरहू इनाम बिलाकुसूर चाले ऐसी गोष्ट केली पाहिजे ह्मणोन विदित केले त्याजवरून आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मी हे जाणोन सदरहू इनाम गोसावी याचे मठास आहे आदलशाहाचे कारकीर्दीस चालत आला असेल त्याप्रमाणे हली पड जमीन याचे स्वाधीन करून इनाम बिलाकुसूर चालवणे या पत्राची प्रती लेहून घेऊन मुख्य पत्र गोसावी याजवळ देणे जाणिजे लेखन अलंकार मोर्तब
रुजू सुरनिवीस
सुरु सुद बार