Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८ ]
श्री.
१६५० ज्येष्ठ शु० ८.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री राघो अनंत गोसावी यांसिः- सेवक चिमणाजी बल्लाळ नमस्कार. सुहसन तिसा अशरीन मया अलफ. तुह्मांकडे सातारियाच्या देणियाचा पैका नेमून मुदती केल्या होत्या. त्यास, तुह्मीं मुदतीअगोदरच सातारा रुपये पाठविलें, ह्मणून राजश्री दादोबांनी सांगितले. बहुत उत्तम गोष्ट केली. तुह्मांस दिवाणच्या देणियाची नकड ठाउकीच होती. ऐसियास, सदरहू ऐवज नेमिल्यापैकीं बाकी राहिली असेल तो ऐवज राजश्री दादोबांकडे पाठवून देणें. अखेर सालचें देणें आहे व सालमजकूरचा पैका राजश्री स्वामीचा द्यावा लागतो, तरी राहिला ऐवज झाडियानसी पाठवून देणें. जाणिजे. छ० ६ जिल्काद. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७ ]
श्री.
शके १६४९.
राजश्री बावाजी जगदेराउ मावळे गोसावी यांसि.
अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य स्ने॥ रंभाजीराजे निंबाळकर सुहुरसन ११२८ उपरी राजश्री पंतप्रधान यांस बारा मावळें दिल्हीं आहेत. तर, तुह्मी त्यांच्या स्वाधीन करून पावलियाची रसीद घेऊन येणें. अनमान न करणें. बहुत काय लिहिणें हे विनंती.
मोर्तबसुद.
श्रीमल्हार
राभाजी
निंबाळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २६ ]
श्रीशंकर. शके १६४९ मार्गशीर्ष शु० १३.
महाराज राजश्री महादाजीपंत पुरंधरे देशपांडेसाहेबाचे सेवेसीः--
अर्जदास्त शेरीकर मोकदम मोजै कोटीत, कर्यात सासवड, सु॥ समान असरैन मया अलफ. बंदगीस अर्ज ऐसाजे. साहेबी पूर्वी अभय दिलेंच होतें. त्यास, फौजदारीच्या शंभर रुपयाबद्दल वरातदार आला आहे. याबद्दल बदगीर यानें अर्जदास्त पाठविली तर अभय दिलें तें सिद्धि पावावयासी धनी समर्थ. वरातदार पाठविले ते यावांचून उठत नाहीं. बंदगीस अर्ज रोशण होय. हे अर्जदास्त. छ० ११ रबिलाखर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २५ ] श्री. शके १६४८ मार्गशीर्ष शु० ३.
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री बाजीराऊ याप्रती, नारोराम कृतानेक विनंती येथील कुशल मार्गेश्वर सुध त्रितिया शनिवार जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे. विशेष. तुह्मी निंबदेवारियाचे मुकामीहून पत्रें पाठविली ती प्रविष्ट होऊन साकल्यअर्थ कळला. तुमच्या यावयाची प्रतीक्षा करीत होतों तों तुमचें पत्र आलें. तुह्मीं यावयाचा विचार केला, आणि अविलंबे आलेत, उत्तम गोष्टी जाहाली ! कंठाजी बांडे याकडील विचार लिहिला. ऐशास, राजश्री सेनापतींनी त्यास कांहीं बोलाविलें नाहीं, अगर चाकरीसहि ठेवत नाहीं. आह्मी त्यास लिहावें, येविषीं सांगितलें; परंतु त्यांणीं कांहीं आपणांपासून अंतर केलें नाहीं. वरकड सविस्तर चिरंजीव राजश्री चिमाजिचे पत्रीं लिहिलें आहे त्यावरून कळेल. तुमचेंहि येणें लवकरीच होईल. भेटीनंतर साकल्य कळेल, तुह्मी कितक विचार लिहिला, तर तुमच्या विचारानिराळें काय आहे ? भेटीनंतर साकल्य वर्तमान कळेल. मग विचार होणें तो होईल. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २४ ]
श्री. शके १६४८ भाद्रपद शु. ५.
तहमखता. सुभा जुन्नर व पुणें वगैरे महाल, कमावीस, राजश्री धोंडो मल्हार, सु॥ सबा असरीन मया अलफ.
रु॥ २५,०००.
यासी नेमणुकः-
स्वस्तिश्री सुखदा *
मुद्राप्रतापोत्कर्ष
वर्धिनी ॥ सरदेशमुख-
स्यैषा शाहुराजस्य, राजते
१९,००० हुजूर पोताकडे.
१७,२५० हुजूर देणें आश्विनमासापासून.
१,७६० मोबदला पोतांतून दिल्हे होते
ते जमा. छ
----------
१९,०००
२५०० अंबाजीपंत मजमुदार.
३०० तशरीफ धोंडा मल्हार,
--------------
२१,८००
२५० का। अबाजीपंत मजमुदार देणें.
४५० वराता.
२०० अंताजी विठ्ठल.
१०० रुद्राजीकृष्ण.
५० दफ्तरदार.
१०० नाईकजी साळोखे.
-------
४५०
----------
२२,५००
बाकी अडीचहजार २,५००.
इ॥ भाद्रपद ता। ज्येष्ठ महिने दाहा दरमहा २५० अड़िचशें दरमा प्रा। द्यावे. छ. ४ मोहरम. हे विनंति.
* लेखना
वधि
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २३ ]
श्रीराम. शके १६४८ श्रावण वद्य ७.
राजश्री धोंडो मल्हार सुभेदार सरदेशमुखी सुभा जुन्नर, पुणें वगैरे गोसावी यांसि :--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। जोत्याजी केसरकर आ। सरदेशमुख दंडवत. सु॥ सबा असरिन मया अलफ. ब॥ देणें रुपये.
१९,००० हुजूर पोताकडे.
२,५०० रा। आंबाजीपंत मजमदार,
३०० तशरीफ धोंडो मल्हार.
४५० वेतनांत,
२०० अंताजी विठल.
१०० नाईकजी साळोखे.
१०० रुद्राजी प्रभू हुजूर.
५० दप्तरदार.
-----
४५०
--------
२२,२५०
थो। रुपये बेवीस हजार अडीचशें घेतले असेत. आदा करणें. हुजूर पोताकडील हावाली रुपये पावलियाचे कबज घेणें. छ. २० जिल्हेज.
स्वस्तिश्री सुखदामुद्रा प्रतापो- लेखन
त्कर्षवर्धिनी सरदेशमुखस्यैषा सीमा
शाहुराजस्य राजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २२ ]
श्री. १६४७ कार्तिक शुद्ध ३.
विनंती उपरी. स्वामींनीं फौज जमा करून पंढरपूरच्या रोखें येतात. फौजा जमा होतात. हे बातमी खबर आसफज्यास पावेलच. तेही विचारांत पडतील. स्वामींसीं बिघाडितात, ऐसें नाहीं. व आह्मींही होऊन नबाबासी विरुद्ध करूं, हें सहसा होणें नाहीं. हाकालपर्यंत आह्मी नबाबास पत्र लिहिलें नाहीं. स्वामी तिकडून लिहिणें तें लिहितात. आमच्या लिहिण्यास व आपल्या लिहिण्यास द्वैतता पडेल, याच अर्थास्तव लिहिलें नाही. प्रस्तुतं स्वामींनीं नवाबास पत्र ल्यावयाचा मजकूर लिहिला. त्याच आन्वयें नबाबास लेहून पाठवूं. सारांश, स्वामींनी कोणेविसी चिंता न करावी. आह्मी, संस्थानाचे गुंते उरकून मोकळे जाहालों. मोकळे रानांत राहातों. स्वामीचे पुण्यप्रतापेकरून जें होणें तें उत्तमच होईल. इकडे मनसुबियाचे नेट पडावें असा नूर मात्र जाहला आहे. मनसबबाज कोण कोणें तरेनें खातो तें दृष्टीस पडेल, तदनरूप स्वामीस लेहून पाठवूं . रा। छ. १ रबिलाखर. बहुत काय लिहिणे ? हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २१ ]
मुसौदा. शके १६४६.
सु॥ खमस अशरीन मया अलफ. सालगुदस्ता सन अर्बामध्यें तुह्मी स्वारी नर्मदेपलीकडे गुजराथ ब मवास व सांगवाडे वगैरे स्वारी करून आलेस, त्याचा हिशेब मनास आणून चौथाई व सरदेशमुखीचा ऐवज तुह्मांकडून करार करून घेतला, रुपये ३८,००० अडतीस हजार. याशिवाय तुह्मांस जे स्वारीशिकारी जाली असेल ते तुह्मांस माफ केली असे. सनमा।रच्या स्वारीच्या हिशेबाचा तगादा तुह्मांसी कांहीं राहिला नाहीं. जाणिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८०
श्री १६२३ वैशाख वद्य प्रारंभ
तपोनिधी राजश्री भवानगिरी गोसावी यास प्रती राजश्री राजा शिव छत्रपती उपरी तुह्मी पत्र पाठविले ते प्रविष्ट जाले मौजे इडमिडे पा। वाई हा गाव रा। सदानंद गोसावी यास या मठास इनाम आहे परतु अनाजी जनार्दन माणको गोविंद व चदनकरी उपसर्ग देतात कितेक वसूल नेला तरी स्वामीनी पारपत्य करावे ह्मणून लिहिले ते सविस्तर विदित जाले ऐशास त्यास हाली ताकीदपत्रे सादर केली आहेत ती पावती करणी ह्मणजे ते या उपरी उपसर्ग देणार नाही जाणिजे बहुत काय लिहिणे
बार
सुरु सुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २० ]
श्री. नकल शके १६४६ फाल्गुन
शुद्ध १२.
परवाना बमोहोर अमारत व अयालत मर्तबात नवाब मुस्तताब मौला अलकाब फलक जनाब खुरशेद रिकाब नवाब निजामनमलुक बाहादुर फत्तेजंग सिपेह सालार याचा करार तारीख छ. १० शाबान सन पांचवा जुलुसवाला आं कीं, देशमुख व देशपांडे व मोकदम व रियाया व मुजारियान परगणे चाकण सरकार जुन्नर सुभे खुजस्ते बुनयाद यांस लिहिलें जातें की, मौजे गोळेगांव व मौजे मरकळ हे दोन मौजे पा। मा।र पैकीं इनाम पिलाजी जाधव यास मा।रनिलेकडून तरतूद पादशाही कामकाजाविशीं बहुत पसंद जाहिरींत आली. याजकरितां करार करून दिल्हे असे. तरी मालवाज बाहार वस्ती हंगाम मारिनिलेकडे देऊन यांचे रजातलबेंत राहत जाणें. याबाबें ताकीद जाणोन लि॥प्रो। अमलांत आणावें.