[ २६० ]
श्रीमार्तड शके १६७४ आश्विन शुद्ध २.
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मल्हारजी होळकर दंडवत विनंती सु॥ सलास खमसैन मया अलफ . तुह्माकडे सरकारचा ऐवज ते ऐवजी बा। देणें दिनानाथपंत सारोळकर यासी समजाविसमुळें रुपये १८०० आठरासे देविले असेत. सदरहू पावते करून कबज घेणें. छ. १ जिल्हेज. हे विनंति. मोर्तबसुद. बार. रु.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडो
जीसुत मल्हारजी
होळकर.