Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ३११ ]

श्री शके १६७६ आश्विन शुद्ध १३.

राजश्री दामोदर माहादेव गोसांवी यांसीः--

उपरि. तुह्मी चिठी पाठविली ते प्रविष्ट झाली. लिहिलें वृत्त कळलें. त्यास, काल नवाब येथें आले होते. त्यांचे आमचें भाषण स्पष्टच जालें. मल्हारबाही होते. पैकियाची निशा करून देतों ऐसे नवाब बोलोन गेले आहेत. त्यास, निशापात करून देतील. उत्तम आहे. नाहीं तरी तुह्मीं उठोन येणें. जाणिजे. छ. ११ जिल्हेज.

लेखन
सीमा.

[ ३१० ]

श्री शके १६७६ आश्विन शुद्ध ४.

राजश्री बापूजी माहादेव व दामोदर माहादेव गोसांवी यांसीः--

उपारि. तुह्मांकडील कारभार आजि आजि उद्यां उद्यां ऐसेच दररोज ऐकतों. परंतु अमलांत येत नाही. याचा विचार काय ? त्यास, आह्मी ऐसेच चैत्रवैशाखपावेतों दिल्लीचे लोकांच्या गोष्टी ऐकत राहावें की काय ? त्यास, तुह्मी याजउपरि तेथील भाव काय तो पष्ट लिहिणें. तदनुरूप पैरवी केली जाईल. जाणिजे. छ. २ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? येथें दोन नावा आल्या. आणिक दोन तीन पाठविणें.

( लेखनसीमा.)

[ ३०९ ]

श्री शके १६७६ भाद्रपद वद्य ९.

राजश्री दामोधर माहादेउ गोसावी यांसीः--

विनंति उपरि. चांदखान बेपारी याचा वस्तभाव कापड तुह्माकडील कमाविसदारानें कनोजेमध्यें लुटोन घेतली. त्याविशीं पूर्वी तुह्मांस लिहिलें होते. परंतु अद्यापि याचा यासी माल न दिधला. त्यास तुह्मांकडील कमाविसदारानें कनोजेमधें राहून मवासगिरी गिरासेपण करावें ऐसेंच असिले तरी हे निश्चय कळलियाउपरि पैरवी करावी लागेल. मशारनिलेचा वस्तभाव देवायाची असिली तरी देवणें. नाहीं तर यांसी साफ जाब देणें. छ. २३ जिलकाद. हे विनंति.

मोर्तब
सूद.

[ ३०८ ]

श्री शके १६७६ भाद्रपद शुद्ध ११.

**** छ २१ जिल्हेज आश्विन वद्य ८.

तीर्थरूप मातुश्री आमा वडिलांचे सेवेसी :-

अपत्यें बापूनें व पुरुषोत्तमानें कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ ९ माहे जिलकाद मु॥ इंद्रप्रस्थ जाणून वडिलीं आपलें स्वकुशल लिहीत असिलें पा।. विशेष. बहुत दिवस जाले आशीर्वाद पत्र येऊन सांभाळावासि न जाली. याकरितां चित्त सचिंत्त असे. तर आलिया मनुष्याबराबर सदैव पाठऊन सांभाळ करीत असिलें पाहिजे. यानंतर येथील वर्तमान पेशजी अजूरदार जोडीसमागमें ****कल्य लिहून पाठविलें व देवाजी नाईक यांणीं मुखवचनें निवेदन केले असेल, त्याजवरून विदित जालें असेल. सांप्रत राजश्री दादा कोणे स्थलीं आहेत, पुण्यास परमारें गेले कीं गांवीं येऊन आपली भेटी घेतली, हें साकल्य वर्तमान लिहून पाठवणें. आह्माविशंई इतकें विस्मरण पडलें की पत्रही व असिर्वादही न लिहिला. रिणानुबंधेकडून भेट होईल तो सुदिन. कृपा केली पाहिजे. दर्शणाचा लाभ होईल तो सुदिन. हे विनंति.

सौ। मातुश्रीसमान माउस सां। नमस्कार. कासीस नमस्कार. चिरंजीव मन्याबाईस आशिर्वाद. तुह्मी कधीही पत्र न लि॥. कारण आह्मांवर रागें आहां की काय ? मातुश्री आमांस आह्मांविषई चिंता करूं न देणें. सत्वरच भेटीस येऊं. हे आशिर्वाद. गंगीस आशिर्वाद.

सौ वज्रचुडेमंडित तुलजा वहिनीस व रेणुका वहिनीस नमस्कार. सदैव कुशल वृत्त लिहित जाणें. हे विनंति.

[ ३०७ ]

श्री शके १६७६ भाद्रपद शुद्ध १०
नकल.

राजश्री दामोधर माहादेव व राजश्री पुरुषोत्तम माहादेव गोसावी यांसः--

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।

मलारजी होळकर दंडवत विनंति सु॥ खमस खमसैन मया अलफ. ****दमूर्ति राजश्री सर्वसुख दुबे जोशी, ब्राह्मण कनोज, वास्तव्य कनोज, यांस प्रा। मजकूर ऐवजी दररोज रुपये १ एक धर्मादाव पेशजी चालत आला त्याप्रमाणें हाली करार करून सनद तुह्मांस सादर केली असे. तरी दुबेमजकुरास दररोज रुपया एक प्रा। मजकूरऐवजीं पेशजीप्रमाणें ****वणें. नवीन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची नकल घेऊन अस्सल पत्र भटजीमजकूराकडे भोगवटियास देणें. रा। छ. ८ जिलकाद. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

[ ३०६ ]

श्री शके १६७६ श्रावण वद्य १

राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसीः-

उपरि. छपरांचें सामान बास, गवत, वगैरे पाठवून देणें ह्मणून पांच सात वेळां लिहिलें असतां छपरांचे सामान पाठविलें नाहीं. याजवरून तुह्मास काय ह्मणावें ? याजउपरि छपरांचें सामान पाठवावें ऐसे स्मरण धरून चित्तांत आणून बहुत लौकर सामान गवत व बास वगैरे गा**** छकडे चारपांच भरून बहुत सिताबीनें कारीगारसुद्धां पाठवून देणे विस्मरण पडो न देणें. जाणिजे. छ. १४ सव्वाल. सदरहू पांच छपर पुरतें सामान पाठविणें. छ. मजकूर.

लेखन
सीमा.

[ ३०५ ]

श्री शके १६७६ श्रावण शुद्ध २

राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसीः--

उपरि. छपरांचे सामान वरचेवर पाठवीत जाणें, ह्मणोन दोन चा वेळ लिहिलें असतां, अद्यापि सामान येत नाहीं, अपूर्व आहे ! याउपर जलदीनें सामान पाठवीत जाणें. ढील न करणें. जाणिजे. छ. २९ रमजान.

लेखन
सीमा.

[ ३०४ ]

श्री शके १६७६ आषाढ शुद्ध १४.

राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसीः--

उपरि. पा। जमली वहील येथील सालमजकूरची रकम रुपये १,२५,००० सवालक्ष घ्यावे लागतात. त्यास, सदरहू ऐवजाची हुंडी पुण्याची करून कोणाकडे ऐवज देविता ते हुंडी लेहून लौकर पाठवून देणें. जाणिजे छ. ११ रजमान, सु॥ खमस खमसैन मया व अलफ.

लेखन
सीमा.

[ ३०३ ]

श्री शके १६७६ आषाढ शुद्ध ९.

अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री यादो रंगनाथ दि॥ दामोदर महादेव गोसांवी यांसिः--

सेवक सदासिव चिमणाजी नमस्कार सु॥ खमस खमसैन मया व अलफ. तुह्मी विनंतिपत्र पाठविलें तें पावलें. रा। सटवोजी मोहिते हवालदार किल्ले ****मसेजेस दाखल केलें. त्यांचे कबज घेऊन पाठविलें आहे. ह्मणोन लि॥ कळलें. उत्तम केलें. जाणिजे. छ. ६ रमजान. किल्यास लोक किती आहेत, जकेरा काय काय आहे, तें तपसीलवार याद घेऊन येणें. उपरांतिक आज्ञा करणें तें केली जाईल. जाणिजे. छ. मा।र. आज्ञाप्रमाण.

लेखन
सीमा.

[ ३०२ ]

श्री शके १६७६ ज्येष्ठ शु॥ ११.

राजश्री दामोदर महादेव गोसावी यासीः--

उपरि. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. सर्व अर्थ ध्यानांत आले. आह्मी मुकामास आलों. तुह्मी किलियास गेलां आहां. तुमच्यानें जे कारेगिरी होईल ते करणें. आणि संध्याकाळपावेतों दर्शनास येणें. जो विचार करणें तो केला जाईल. लौकर यावयाचें करणे. जाणिजे. छ. ९ साबान. बहुत काय लिहिणें ?

लेखन
सीमा.