Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३०१ ]
श्रीह्माळसाकांत. शके १६७६ ज्येष्ठ शुद्ध ११.
राजश्री देवराव माहादेव गोसांवी यासी :-
दंडवत विनंति उपरि. हरिभक्तपरायण राजश्री रामचंद्र गोसावी पैठणकर येतात, यास्तव, तुह्मीं यावयाचें करणे. रा। छ. ९ शाबान. हे विनंति.
( मोर्तबसुद. )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३०० ]
श्री शके १६७६ ज्येष्ठ शु॥ ९.
श्रीमंत माहाराज राजश्री आईसाहेब यांणीं राजश्री गोविंदराव पांढरे यांसी आज्ञा केली ऐसी जे. तुह्मांस हुजुर दर्शनास यांवयासी आलाहिदा आज्ञापत्र सादर केलें असे; तरी देखतपत्र हुजूर दर्शनास येणें. मुक्कामांस जागोजी दलवणी व संताजी डांबे हुजरे पाठविले. यांसी खर्चीस रुपये ५०, पन्नास देविले आहेत. अदा करणें. जाणिजे. छ. ७ साबान सरुसन खमस खमसेन मया अलफ. बहुत काय लिहिणे ?
लेखन
शुध.
बार. सुर सुद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९९ ]
श्री शके १६७६ ज्येष्ठ शुद्ध ९.
राजेश्रियाविराजितराजमान्य राजश्री दामोदर महादेव गोसांवी यांसिः--
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. तुह्मीं पत्रें अजुरदाराबरोबर पाठविलीं. त्यांस मार्गी दोन दिवस लागले. अजी गुरुवारी तीन प्रहरा दिवसी पत्रें पावली. त्यांत अर्थ. पातशाहाचे बुणगें लुटले. सार्वभौम व वजीर दुसरा करावा, हा भाव सर्वाचा आहे. ह्मणून लिहिलें. ऐशास, न कळे ! हा प्रकार ईश्वराधीन आहे ! आमचा मुकाम आज जेवर दोन कोस मागे टाकून जाला आहे. उदईक येथून कूच होऊन दाहा कोसावरी मुक्काम करितों. मल्हारबासही येणें ह्मणोन लिहिलें आहे. ऐशास, तुह्मी लौकर येणें. भेटीनंतर जो विचार करणें तो केला जाईल. शुक्रवारी अस्तमानपर्यंत येऊन पोहोचणें. जाणिजे. छ. ७ साबान. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९८ ]
शके १६७६ वैशाख.
पांच चार लाख रुपये आमच्या तहबरीत तरी, अगर खर्चायांत तर तनखा हर कोणी महालावर देऊन रवाना करील, तरी नाना येथें राहून आह्मी मुकाबिलियासी जाऊं. नाहींतरी आह्मी आपल्या सिपाहीचा गवगवा तोंडाने चौ चौ तटांनशी राखूं. तुह्मांबराबर आह्मी आपला जिगरच दिल्हा आहे. तेथें पहिले आह्मी आहोंच. तुमचें होणार असेल तें हो ! अगर आमचें होणार असेल तें हो ! तुह्मी वजिराचे रफिक आहां ; ह्मणून तुह्मांस सांगतो. आह्मीहि तुह्माबरोबरच आहों. जीवच लावला तेथें मालाचा विचार काय ? तुह्मास इतल्ला द्यावी यास्तव एक मुकाम केला. उद्या आमचा कूच आहे. त्याप्रों। सांगून त्रिंबकपंतांबराबर अगर चिरंजीवांबरोबर सांगून पाठवा. तो ह्मणेल कीं, वजिरास भेटा तरी तुह्मीं जाऊन त्याचे सांगितलियाप्रयाणें वजिरास भेटा. कांहीं सरंजामाची तजवीज करीत असिला तरी, एक दोन दिवस राहावें. चतोर्थीचे दिवशीं प्रहर रात्र मागील राहतां मुहूर्त चांगला
आहे. जर तनखा करूस देत असिले तरी, माहालाच्या सनदा करून देऊन इकडे पांच पांच हजार फौज दाखवित असिले, त्याजकडे पारचे वरचे दोन जिल्हे दोन आहेत, तैसे आपलियासी एक जिल्हा जरी दाखवून रवाना करीत असले, तरी दोन्ही जिल्ह्याचा इरादा आहे. व पारचे जिल्हियाचा इरादा याचें मय तरी याजला प्राप्त होईल. आपलियासी दोन कामें जरूरः- एक आपली हद कायम राखणें, आणि वजिराची निगेबंदी करणें. त्यानंतर पुढें मेळवायाची गोष्ट ! याचा विचार आह्मां देखतां जो कर्तव्याचा तो करून, रवाना कराल, तरी एक दिवस आणखीहिं राहूं. नाहींतरी फौजेच्या गवगव्याकरितां आमच्यानें क्षणभर थांबवत नाही. याप्रों। बोलोन स्वकार्य साधेल तेथवर साधावयाचा तरजमाहि करून पाठवा. आणि पत्रहि पाठवा. हे आशीर्वाद.
रा॥ त्रिंबकपंतास नमस्कार विनंति उपरि. लिहितार्थ परिसोन कर्तव्य तें करणें. हे विनंति.
रा॥ धोंडाजी नाईकास नमस्कार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९७ ]
श्री शके १६७६ वैशाख.
आतां तो चाळीस लाख रुपये आह्मांस देईन, ह्मणून टीप लिहून दिधली हें पाहा. ऐस्या कितीक गोष्टी सांगून सलूखच करावा हें मुराद ठैराविली. तेव्हां आह्मीं ह्मटलें कीं, आपण सलुख समस्तांचे ह्मटल्यावर आमचे खाविंद येऊन रुपये मागतील ह्मणून ह्मणतां; तर हाहि अंदेशा ठेवणें लागेल कीं, तुह्मी सफदरजंगास एक सुभा द्याल तर ते येऊन विजारत देवितील. व जर तुह्मी सख्य न करितां युद्धच कराल, व त्याची तकशीर माफ न कराल, तर आमचे खाविंद त्यास मारून त्या उभयतांचे मस्तकच आणून किल्याखालें टाकतील. ते आह्मांपासून शपथपूर्वक लिहिलें घेणें. तेव्हां ह्मणूं लागले कीं, तस्मात् खर्च मागतील; हें वोझें आमच्यानें न उचले; जें होणें तें हो ! आतां तुह्मीं याल ते रुपये मागाल; आह्मांस कोठून रुपये मिळणार नाहींत. तेव्हां तुह्मीं सफदरजंगासारिखे होऊन दुसराच पातशा करूं ह्मटल्यास याजलाच युद्धास प्रवर्तावें लागेल. यास्तव लिहिलें द्या कीं खर्चास न मागूं. याप्रों। भयाभीत होऊन सफदरजंगाचेच गळां हात घालावयासी तयार जाले. हें निश्चयरूप दिसून आलें. तेव्हां लाचार होऊन, लिहून दिघलें कीं, श्रीमंत दादासो। येऊन त्या उभयतांसी सलुक करणार नाहींत, व बेसनद पैसाहि मागणार नाहींत ; येविसीं ईश्वर साक्ष असे कीं, त्यांजला निश्चयात्मक मारतील. याप्रों। लिहिलें देऊन श्रीमंतांकडून भयाभीत जाली होती व सफदरजंगाचे गळां हात घालून आपणांपासून दूर राहावेयाचा निश्चय केला होता, तो मोडून, लडाई श्रीमंताचे प्रतापें, आज्ञेप्रों। ठैराविली. उदईक रुपये अकबत महमुदास देऊन महिनियाचे वायदियानें सा लक्ष रु॥ करून द्यावेसे करून वाटें लावितील. लडाई शुरू होईल तेव्हां सो। लिहूं. कृपा करून आमचे नेमणुकेची सनद, व थोडेसे फौजेनिशीं सत्वर सत्वर वडिलीं आलें पाहिजे. सत्वर येणें. जरूर पुढें येणें. खाविंदास विनंति करून सनद फौजेचे नेमणुकेची पाठविणार स्वामी समर्थ आहेत. अझुनहि कमरदानी करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. सत्वर यावें. भेट होईल तो सुदिन ! हे विनंति. चिरंजीव तात्यास आशीर्वाद. रा॥ त्रिंबकपंतास नमस्कार. समस्त मंडळीस नमस्कार अनुक्रमें आशीर्वाद सांगणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९६ ]
श्रीमोरया शके १६७६ वैशाख वद्य ९.
छ २१ रजब.
पु॥ राजश्री दामोदर महादेव गोसावी यासीः--
विनंति उपरि. जातेसमयीं बोलिले होतेस कीं, तुर्त ग्वालेरीस जातांच नवाब सफदरजंगाच्या बाणांपैकी दोनसे बाण पाठवितों. ह्मणून कबूल केले होते; त्याचा जाबसाल कांहीं लिहिला नाहीं. तरी, याउपरि आइते बाण व कारखाना ग्वालेरीस घालून बाण सत्वर पोचेत, तें करणें. दुसरेः-गुजरातची सनद पाठवून देतों, ह्मणून बोलिलां. तरी गुजरातचे सनदेचें स्मरण घरून पाठवून द्यावी. वरकड वर्तमान अलाहिदा पत्रावरून कळेल. सारांष गोष्ट सफदरजंगास सांगोन सांगितल्याप्रमाणें तरतूद केलियानें, त्याचे कार्याची गोष्टी आहे. विस्तारें काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९५ ]
श्री शके १६७६ वैशाख शुद्ध ३.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री दादो महादेव गोसावी यांसिः-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ. कान्होजी मोहिते यांणी वसंतगडास राहून मुलकांत नानाप्रकारें लूट धामधूम केली. कितेक ब्राह्मण नागविले. ती त्याची वर्तणूक जगप्रसिद्ध आहे. प्रस्तुत वसंतगड राजश्री यमाजीपंत यांनी घेतला. तुमचा आश्रा कान्होजी मोहिते यांनी केला. त्याजवरून तुह्मी यमाजीपंतासी विरुद्धास्पद वर्तता. ह्मणोन कळलें. तरी हे गोष्ट काय कामाची ? कान्होजी मोहिते बदफैली होते. त्याचें पारपत्य यमाजीपंतांनी केलें. ते तुह्मी संतोषच मानोन, ते व तुह्मी एके विचारे चालोन, आज्ञेप्रमाणें वर्तणूक करावी, युक्त असतां, तुह्मीच आपल्यांत आपण वाईट दाखवूं लागल्यास पुढें योजिलें कार्य आज्ञेप्रमाणें सिद्धीस जाणें कळतच आहे ! ऐसी गोष्ट नसावी. सहसा तुह्मी न करणें. कदाचित् कारभार संमंधे यमाजीपंताकडे अंतर असिलें तर अंतराचे कलमाची याद हुजूर पाठवून द्यावी. येविशीची आज्ञा करणें ते त्यास करून, अंतरें दूर केली जातील. ते गोष्ट तुह्मीं एकीकडे ठेऊन, तेथील तेथें विरुद्ध दाखवितां, ते एकंदर न दाखवणें. आज्ञेप्रमाणें एकरूप राहून आज्ञेप्रमाणें कार्यभाग करणें. वर्तमान लिहीत जाणें. खासा स्वारी अविलंबेंच त्याप्रांतें येत असे. तेही भेटीस येतील. तुह्मीं याल. जें सांगणे तें सांगितलें जाईल. तावत्काल पहिलेप्रों। ऐक्य तेनें राहून कामकान करीत जावें. कानोजी मोहिते यास न ठेवणें. वरचेवर सर्व वर्तमान लिहीत जाणें. हिसेब वसूल वसुलाचे तयार करून ठेवणें. छ. १ रज्जब. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७५
१५८४ आश्विन शुध्द १२
मसरल सर्जाराऊ जेधे प्रति सीवाजी राजे सु॥ सलास सीतैन अलफ तुह्मास रजा फुरसदगी दिधली ऐसियासि फुरसदगी देउनु बहुत रोज जाले आणि तुह्मी आले नाहीत तरी हाली रोखा पावता च हुजूर येणे घोडी गावी ठेउनु तुह्मी च हुजूर येणे छ १० सफर मोर्तब सूद
रुजु सुरनिवीस
→शिवकालीन पत्रव्यवहार - मूळप्रत लेखांक २७४ व २७५ पाहण्यासाठी इथे क्लीक करा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९४ ]
श्री १६७५ फाल्गुन शुद्ध १२.
राजश्री बाजीराउ रखमांगद गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मल्हारजी होळकर दंडवत सुहुरसन अर्बा खमसैन मया अलफ. आगरियाच्या किल्यांतील तोफा काहाडावयास अजबसिंग व महमद मुरीदखान यांजला येथून पाठविले आहेत. तर, किल्लेदारास सांगून तोफा जलद तयार करून पाठवणें. आगरियाच्या मुतसद्दियांस खर्चामुळें रु॥ १४०० चौदासे सामळांत देविले आहेत. त्याप्रमाणें दोन तोफा तयार करून जलद पाठवणें. येविषयीं श्रीमंतांनीं राजश्री रामाजी सखाजी व केशव गोविंद यांजला लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. जाणिजे. छ. ११ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर
खंडोजीसुत मल्हार-
जी होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९३ ]
श्री शके १६७५ फाल्गुन शुद्ध ९.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदर महादेव गोसावी यांसि :-
सेवक रघुनाथ बाजीराऊ नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. बद्दल देणें नवाब गाजदीखान यास घ्यावयास खो। खिलत गु॥ मोतीराम हजाज रुपये १३८८॥ तेराशे साडेअठ्यासी रुपये देविले असेत. प्रां। अंतरवेद येथील महालाच ऐवज तुह्मांकडे येणे त्यापैकीं सदरहू ऐवज मोतीराम यांस देणें आणि पावल्याचें कबज घेणें. जाणिजे. रा॥ छ. ८ जा।वल, सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
लेखनसीमा.
बार.