[ २६४ ]
श्रीमार्तंड, शके १६७४ आश्विन शुद्ध ७.
राजेश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राज्यमान्य स्ने॥
मल्हारजी होळकर दंडवत सु॥ सलास खमसैन मया व अलफ. सरकारचा ऐवज तुह्माकडे ते ऐवजी बा। देणें बाळाजी + + यासी सममजाविसबा। रुपये २६०० सवीससे देविले असेत. ते पावते करून कबज घेणें. जाणिजे. छ. ६ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब बार. रु.
सुद.