[ २६५ ]
श्री. शके १६७४ आश्विन शुद्ध ८.
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत सु॥ सलास खमसैन मया व अलफ. तुह्मांकडे सरकारचा ऐवज, ते ऐवजी बा। देणें राहोजी थोरात समजाविस पैकी रुपये १०२५ एक हजार पंचवीस देविले असेत. सदरहू ऐवज मशारनिलेनीं बाबूराव राम याजला कर्जामुळे देविले असेत. सदरहू ऐवज नख्त पावता करून कबज घेणें. छ. ७ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडोजी
सुत मल्हारजी हो-
ळकर.