[ २६६ ]
श्री. शके १६७४ आश्विन शुद्ध ११.
राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसिः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मलारजी होळकरे दंडवत विनंति सु॥ सलास खमसैन मया अलफ. सरकारचा ऐवज तुह्मांकडे; ते ऐवजी दा। राहूजी थोरात समजाविसमुळें रुपये १००० एक हजार देविले असेत. सदरहू ऐवज मारनिलेनें रदकर्जमुळें दादोबा मिसाळास देविले असेत. पावते करून कबज घेणें. जाणिजे. छ. १० जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तबसुद.
बार.
श्रीह्माळसाकांतचरणीं तत्पर
खंडोजीसुत मल्हारजी होळकर.