[ २६३ ]
श्री शके १६७४ आश्विन शुद्ध ५.
छ राजश्री दामोधर माहादेव गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥
मल्हारजी होळकर दंडवत विनंती सु॥. सलास खमसैन मया अलफ. सरकारचा ऐवज तुह्मांकडे. त्यापैकीं बा। देणें, गंगाजी सितोळे यांसी, रुपये
३५६४ समजाविस.
२४३६ नालबंदी.
----------
६०००
२५० पडली घोडीबा।.
-----------
६२५०
सवासाहा हजार देविले असेत. पावते करून कबज घेणें. छ. ४ जिल्हेज. हे विनंति. मोर्तब सूद.
श्रीह्माळसाकां-
तचरणीं तत्पर खं-
डोजीसुत मल्हार-
जी होळकर.