Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८३ ]
श्री शके १६७५ ज्येष्ठ वा। ४.
श्रीमंत महाराज राजश्री-आईसाहेब यांणी राजमान्य राजश्री जगजीवन पंडीत प्रतिनिधी यांसी आज्ञा केली ऐसी जेः- राजश्री गोपाळराव यादव यांची बटीक पळोन बुधास गेली. ते आणावयांबा। मशारनिल्हे यांनी माणसें पा।. ती बटीक घेऊन येत होतीं, ते मार्गी वस्तीस मोजे शेंदुरजणे येथें राहण्यास आले. तेव्हां गांवकरी यांणीं बटीक व माणसांची चिरगुटें घेतलें होतें ह्मणून हुजुर विदित झालें. त्यावरून गांवास हुजरे रवाना केले आहेत व तुह्मांस हें आज्ञापत्रे सादर केलें आहे, तरी गांवास ताकीद करून बटीक सातारा रवाना करणें. जाणिजे. छ १७ माहे शाबान सु॥
अर्बा खमसैन मया व अलफ. बहुत लिहिणें तर सुज्ञ असा.
लेखना
वधी.
पो।
छ. २८ रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८२ ]
श्री शके १६७५ चैत्र-वैशाख.
राजाश्रयावराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत व राजश्री पुरुषोत्तमपंत नाना स्वामीचे सेवेसीः-
पो। अंताजी माणकेश्वर साष्टांग नमस्कार विनंति उपरि. आह्मास नबाब वजीर यानें दहा लाख रुपये देऊन आपणाकडेस घेऊन जावयासी करार केलें. त्याजवरून आह्मीं तुह्मास सांगितले. तुह्मीं साफ सांगितलें जे, दहा लाख कामाचे नाहीत, यांत श्रीमंताचें नुकसान आहे, तरी त्याचा पैका टाकून पातशाहाचे चाकरीस आमचे आज्ञेप्रमाणें एकनिष्ठ राहणें. त्याजवरून आपण मान्य केलें. अतःपर नबाब वजीर आह्मास पंचवीस लाख रुपये देईल तरी आपण नबाब वजीराकडे जाणार नाहीं. जेथें तुह्मीं पातशहाची एकनिष्ठ चाकरी सांगाल त्याप्रमाणें करून. त्यांत अंतर करणार नाहीं. बहुत काय लिहिणें ? कृपा असो दीजे हे विनंति. मिति शके १६७५ श्रीमुखनाम संवत्सरे. हे विनंति. सु॥ सलास खमसेन मया व अलफ. तुह्मीं आह्माशीं पातशहाच्या घरच्या व हरएक कामांत तफावत सर्वथा न करावी व आमच्या मानांत उणें न करावें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८१ ]
श्री शके १६७५ चैत्र वद्य ४.
श्रीह्माळसा-
कांत चरणीं तत्पर खंडो-
जीसुत मल्हारजी हो-
ळकर.
राजश्री दामोदर महादेव व पुरुषोत्तम महादेव गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मलारजी होळकर दंडवत विनंति सु॥ सलास खमसैन मया व अलफ. अंतरवेदच्या महालांऐवजी तुह्मापासून ऐवज घेतला आहे :-
१,२५,००० दस्तखत अलाहिदा
१७,०८७ लोकांस देविले त्याची मिती. सवा लक्षाच्या
खताप्रमाणें व्याजदेखील सिरिस्ता करार
-----------
१,४२,०८७
एक लक्ष बेतालीसहजार सत्यासी रुपये सदरहू ऐवज हिशेबासुद्धां अंतरवेदच्या माहालऐवजी उगवून घेणें. मजुरा असेत. छ. १६ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ? हें विनंति.
बार
मोर्तब
सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८० ]
श्री शके १६७५ चैत्र शुद्ध ३.
राजश्री दामोधर माहादेव व पुरुषोत्तम माहादेव गोसावी यांसी :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपर येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असावें. विशेष. श्री भक्तपरायण राजश्री तिमण्णा गोसावी यास देवाच्या पुजा नैवेद्य ब्राह्मणसंतर्पणकरितां प्रांत अंतरवेद येथें दरगांवास अमल आहे. त्यास, रु॥ १ येकप्रमाणें दरसाल करार करोन हें पत्र तुह्मांस दिल्हें असे. त्यास तुह्माकडील महाल बि॥.
१ पा। कनोज
१ पा। सोरा
१ प्रा। गंगेरी
१ पा। बचलाणें
१ पा। सिकंदरा
१ पा। जलाली
----
६
सा महाल प्रांत अंतरवेद येथील दरगांवास दरसाल रु॥ १ येक प्रों। आकारून जमा करून श्रीस प्रविष्ट करीत जाणें. नूतन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची नकल घेऊन भोगवटियास हें पत्र माघारें देणें. छ. १ जमादिलाखर, सु॥ सलास खमतैन मया अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
मोर्तब
बार रु॥ सुद.
श्री ह्माळसाकां-
तचरणीं तत्पर खंडो-
जीसुत मल्हारजी
होळकर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७९ ]
श्री
शके १६७४.
यादी. प्रांत गुजराथ येथील परगणे वांटणी श्रीमंत पंतप्रधान पेशवे व श्रीमंत गायकवाड सेनाखासखेल समशेर बहादूर यांचे सु॥ ---------------------------------------- महासुमारी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७८ ]
शके १६७४.
कैलासवास केलियावर तुह्मी असा डौल घातलात कीं, सर्वाध्यक्षता आपली, आमचे तर्फेचे माणसानें राजाजवळ एकांती बसूं देखील नये. रात्रीं दिवसा तुमची चौकी. ते प्रसंगी जे जे तुमचे पक्षीं लागले ते वाचत चालले, असें दिसों लागतांच वडूथचे तळावर रामाजीबावाजवळून तुह्मास सांगितले की, ऐसे न करावे. बाबानींहि सांगितलेच असेल. परंतु, आपण बहुमान मात्र बाबासी करीत गेलेत. ते गोष्टीचीहि आह्मी गमच खादली. तदोत्तर, सातारियासी दाखल होताच, आह्मीं शिवाजी हरि, देवराव, बाबूजी नाईक यांचा अभिमान धरिला. तुह्मीं जे माणूस आह्मांकडे आलें तें माडीतच चाललेस. तथापि आह्मी, शिवाजी हरि केवळ तुमचा ग्रामकंटक व लबाड ऐसें जाणून, त्याचा अभिमान सोडिला; देवरायास पोटास मात्र देविलें ; नाइकास कर्णाटक द्यावें, नाहीं तर, पांचा साताचा सरंजाम द्यावा. तेव्हां तुह्मीं बाबानीं मिळोन कर्णाटक मस्त हस्ती जलाली फकिराचे दारी बांधला-ह्मणजे दउलतीची फजिती केली. अखेर कर्णाट काढलें. तेव्हां सरंजामहि न दिल्हा. याप्रकारे ज्या ज्यांनी मुख्यपणें आमचा पक्ष मनांत आणिला ते सर्वस्वें बुडाले. या प्रसंगामुळें फारच आह्मास राग येऊन आह्मीं रुसून बाहेर आलों. तें समयीं तुह्मीं बाबांनी आपले जागा विचार करून आह्मापासून इमान तुह्मास देविलें. तुह्मीहि शफथ केली कीं, सहसा स्वामीचे हिताविशीं मजपासून कायावाचामनें अंतर होणार नाही. त्या दिवसापासून तुह्मीं कोणे प्रकारें चाललेस, हें मी जाणतो; मी कसा चालतों हें तुह्मी जाणत असाल. सांप्रत काळीं नाना प्रकारें लोक सांगतात तें एकीकडे ठेवून तुह्माजवळून पुर्ते अंतर पडेल तेव्हां आपणहि अंतर करावें. इतक्यांत, तुह्मीहि सर्व प्रकारें आमचे पक्षी, हें भाऊनीं बाबांनी सांगितलें. तदनरूप तुह्मीं गडकरीयांस भरवसा पुरवून राजे आईसाहेबास खालीं आणावयाचा विचार केला; चवकी मारली. एका दो दिवशीं खाली उतरून सुरळीत चालावें, दुलौकिक उभय पक्षींचा वारावा, तो विचार टाकून, बाबा रुसून घरास गेले. हें आइकतांच सुस्त पडलेत. माणसें देखील पळवूं लागलेत. हें कांहीं तुमचें इमानास योग्य नाहीं. बाबाचा आमचा रुसवा जाहाला तर तुह्मांस इतकी योग्यता आहे --
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७३
श्री १५७५ मार्गशीर्ष शुध्द ३
नकल
श्रीमंत राजश्री सीवाजी राजे महाराज साहेबाचे सेवेसी
दा। बा। यजितपत्र बाबाजी सिवदेक सोनटके गु।।स्ते दिमत दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी व गावकुलकर्णी ता। उत्रोली व ता। भोर ता। रोहिडखोरे सु॥ सलास खमसैन अलफ हुजूर केदारजी बीन नरसोजी व खडोजी बीन धर्माजी खोपडे देशमुख ता। उत्रोली याचा महजर गोत वगैरे माहाराजाचे समोर हाजरमजालसीत जाला कथला तुटून निमे निमे वतन उभयतानी खावे असे जाले त्यात मी लबाडी करून आपले बिकलम लिहिले की देशकुलकर्णी ह्मणोन घातले याची खबर खोपडे देशमुखानी हुजूर केली सबब मला आणोन राजगडी कैद करावेसे केले त्याजवर मी कबूल जालो की मी चाकर प्रभु देशकुलकर्णी याणी आपले घर भावाचे मुले आणून चौघा गोताचे व ठाणे सिरवळचे अमीनाचे मते नजराणा होनु देऊन घेतले आणि दोन्ही खोरीयाचे वतनास अधिकारी दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी व गावकुलकर्णी करून रोहिडखोरे व वेलवडखोरेचे वतन चालवीत असता मी लबाडी केली असे गोताचे व जमेदाराचे सरकारचे पारखीस आले मी बिकलम आपले नावे लिहिले ते खोटाई करून लबाडीने लिहिले ही चुकी मजकडून जाली मी चाकर वतनदार नव्हे हा गुन्हा मजकडून जाला याउपरी असी लबाडी केल्यास दिवाणाचा गुन्हेगार व गोताचा खोटा छ ३ मोहरम हे लेहून दिल्हे सही हस्तक्षर खुद
गोही
इ. इ. इ.
(याप्रमाणे कागद हुजूर लिहून दिल्हा त्याची नकल पुढे कामा येईल सबब दादोपत दिमत सरकार याणे दिल्हे सन मा।र)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७७ ]
श्री
१६७४.
राजश्री सटवोजी जाधवराव गोसावी यांसीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. तुह्मीं मुहुर्तेकरून निघोन सत्वर हुजूर येणें. आणि राहिले लोक मागाहून लौकरीच येत, तें करणें. जाणिजे. छ २५ रबिलावल. मुहुर्तेकरून चांभारगोंदियासच येणें. मागाहून लोक येतील. बहुत काय लिहिणें ?
( लेखनसीमा ).
० श्री ॅ
राजा शाहूनरपति हर्षनिधान,
बाळाजी बाजीराव प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २७६ ]
श्री
शके १६७४.
यादी ------------------------
तह श्रीमंत महाराज मातु:श्री आईसाहेब यांसी राजश्री नाना पेशवे यांनी करून दिल्हा. वि॥ राजश्री मोरो शिवदेवे व कारभारी नि॥ श्रीमंत महाराज मातुःश्री व महादाजी नाईक निंबाळकर व दिनकर महादेव वकील निसबत राजश्री पंतप्रधान. कलमबंदाचे अक्षर मोरो शिवदेव यांचे हातचें. कलमागणित मखलाशी खुद्द श्रीमंत राजश्री पंतप्रधान नानासाहेब यांचे हातची.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७२
श्री १५७५ श्रावण शुध्द ३
अज रख्तखाने नरसो धोडदेउजी हवालदार व मुदसदियान किले रोहिडा बु॥ दौलतहू बजानेबू ता। बालोजी पटेल कुढले मोकदम व नाइकजी पटेश्ल कुढले यमोकदम मोजे करजीये तर्फ मजकूर सु॥ सन सलास खमसैन अलफ तुह्मी हर दोजण किला येउनु अर्ज केला जे गोदनाक माहार महुडेकर किलेमजकूर हा दिवाणाचा चाकर असता अमचे बराबर ठाण्याहुनु दिवाणची सदरी ठाणगावर मारिला सबब येउनु कसाला गुजरला आमचे बाप भाऊ वडील व बिरादभाऊ धरुनु स्वारीचे लोकानी खाना मागितला त्याप्रमाणे लोकास बकरी माजूम वगैरे खाना देउनु नीट बदोबस्त करुनी खुसी केले त्याउपरी काही लोक निजले काही लोक रखवालीस बसले त्याणी गाऊमाहारास ताकीद केली जे दो पटेल मोकदम भाऊ बिराद फरजद नफर सारे चीजबस्त घर तुह्मा महाराचे हवाला केले असे यातील अफरातफरा हिलाहरकत जाल्यास तुमचे सारे गाऊमाहाराच्या गरदना मारू याप्रमाणे ताकीद करुनु सारे लोक निजले त्याउपरी अह्मी व आमचे बाप भाऊ बिरादर फरजद याणी विच्यार केला जे दिवाणचा ठाणगा आपले वडिलानी मारिला याबाबे आपल्या गरदाना मारितील हे खास दिसते आता आपल्या जाण्यास वाट आपले माहारापासी मागावी असा मनसुबा करुनु गाउमाहारास सला पुसिली तो गाउमाहार बोलिले जे आह्मी तुमचे जिवासाठी दिवाणचे गुनेगार होऊनु आपल्या लेकराफरजदासुध्दा गरदना मारुनु घ्यावया हा हिया आमचे हातुनु होत नाही असे सर्वानी सागितले त्याउपरी आमचे बाप व बिरादर भाऊ व फरजद यास जरब पडुनु गोदनाक माहार महुडेकर किलेमजकूराचा चाकर याजला भाकेत गवसुनु वचन घेतले जे आमचे सारे जीऊ वाचवणे त्याजवरुनु गोदनाक बोलिला जे माझी तर गरदान तुह्मा बाबती मारितील त्यास मी कबूल आहे परतु माझा फरजद अरजनाक यास काय तुह्मी आपले वतनापैकी वतन देता ते तुह्मी आपले पूर्वज स्मरुनु कबूल केल्यास पार करुनु देतो त्याजवरुनु ते वेळी गोदनाकास वचन दिल्हे की आह्मी आपले इनामपैकशी रु॥ ३॥6 तीन येक पैस व खालिसापैकी वहाण काबळे बरकस रान व खाचरसुधा देऊ व गाऊमहाराचे इनामपैकी हिसा अठवा रकम टका ।. रुके बारा व हडकी हडवळ्यात हिसा अठवा व बइत्यात हिसा अठवा व घर गाऊमहाराचे वेळी बारा घरटका व वणह्मैस पालक व गाऊमाहाराची तरालकी दरोबस्त तुजला व तुझे भाऊ बिरादर फरजंद याजकडे अवलाद अफलाद चालऊ या वचनास जो आमचे वशातील भाऊ व बाप फरजद व बिरादर भाऊ नव बिगर हक बिरकत करील त्यास पुर्वजाची व श्री माहाकाळाची शफत असे त्याप्रमाणे ते वेळी इनाम जाले ते आह्माकडून गोदनाकास मिळावे तो गोदनाक आमचे बाबती गुन्ह्यात येउनु दिवाणानी ठार मारला असा गोदनाक आमचे वडिलाचे उपयोगी येउनु आमचे जिऊ वाचविले ते वचन आह्मी गोदनाकाचे फरजदाकडे चालविणे जरूर या बाबे किला येउनु अर्ज केला हा दिवाणानी आमचा अर्ज खातरेस आणुनु अर्जनाक गोदनाक याचा फरजद यास आमचे वडिलाचे व आमचे वचनाप्रमाणे गाऊ महाराकडुनु करुनु दिल्हे पाहिजे याजवरुनु तुमचा अर्ज खातरेस अणुनु तुमचे गुन्हे माफ दिवाणातुनु तुह्मा मोकदमास माफ करुनु तुमचे अर्जदास्ताप्रमाणे धाकनाक वलद जाननाक माहार याजला पुरसीस केली जे हर दोजण मोकदम याचे बोलणे सदरहू तुजला कबूल असल्यास इमाने कबूल होणे त्याजवरुनु धाकनाक मजकूर बोलिला जे मोकदम पटेल त्याचे इनाम गोदनाकाजवळ जाले ते च माझे पुर्वजाचे व माझे व माझे फरजद वशासुधा जाले मोकदमाचे वचनाप्रमाणे अर्जनाक वलद गोदनाक यास माझे वतनापैकी वतन अठवा हिसा व व घर यासुधा घ्यावे त्याजवरुनु तुजला पुरसीस केली जे तू कबूल जालास याचे इनाम करणे त्याजवरुनु तू इनाम केलेस जे माझे वौशी जो तरालाचे वतनास व मोकदमाचे वचनास हिलाहरकत करील त्यास पूर्वजाची शफत व माझे जातवले देवाची व पाहनीचे देवाची शफत आमचे भाऊ बिरादर फरजद व वौशिक यास असे त्याजवरुनु तीन बिनादरा खातरेस आणुनु गोदनाक याचा फरजद अर्जनाक याजला तुमचे कबुलाती अजदास्तीवरुनु बहाल दिवाण करुनु दिल्हा जातो जे मोकदम याचे इनामपैकी रुके 6 ३ 6 तीन एक पैसा व खालिसापैकी वहाण काबळ्याबदल वरकस रान व खाचर याप्रमाणे व गाऊ माहार याचे माहारकींपैकी इनाम रकम टका । बारा रुके हिसा आठवा व हडकी हडवला व मढ्यात व दाईत्यात वगैरे हिसा आठवा व दरोबस्त तरालकी व वेलीचा घर व घरटका व वण व पालक व मानापैकी माहाराचे वतनापैकी एक मान देऊनु चालवावे असे मोकदम व गाउमहार याचे अर्जावरुनु दिवाणातुनु बहाल करुनु दिल्हे असे तरी ही सनद अर्जनाक वलद गोदनाक याचे दुमाला करुनु चे फरजदाचे फरजद अवलाद अफलाद तरालकाचे वतन माहारपणाचे वगैरे बाबती माहारपणाच्या दरसाल ताज्या सनदेचा उजूर न करणे या सनदेची तालिक लिहून घेउनु मुख्य सनद अर्जनाक वलक गोदनाक तराल याजपासी फिरोन देणे जाणिजे छ १ रमजान मोर्तब सुद (शिक्का)