Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९२ ]
श्री शके १६७५ माघ वद्य १.
पौ। छ. १७ रबिलासर
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो
जयाजी शिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. नवाबास घेऊन सत्वर येतों ह्मणून लि॥ तर उत्तम असे. अंगुरेंकुती १ एक तुह्मी पाठविली ती प्रविष्ट जाहाली. जाणिजे. छ १५ माहे रबिलावर. रूपराम गांवांतून आला. त्याच्या चित्तांत बोलावयाचे आहे. परंतु श्रीमंत त्यांसी कांहीं बोलत नाहीं. कांकीं तुह्मासी बोललें आहे. याजकरितां यांसी बोलत नाहीं. तुह्मी नवाबास घेऊन आलियावरी जे बोलणें तें नवाबाच्याच विचारें जें होणें तें होईल. नवाबास घेऊन लौकर येणें. दिवसगत न लावणें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीज्योति-
लिंग चरणीं तत्प-
र राणोजी सुत ज-
याजी शिंदे नि-
रंतर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९१ ]
पौ। छ १ रबिलाखर. शके १६७५ माघ शुद्ध २.
निघून मरणें जालें तर मरेल; परंतु पातशाहासी व तुह्मांसी अन्यथा विचार करणार नाहीत. त्यासी तो ईश्वरें मारिलें आहे. तुह्मीं सुभ्याकडे रूख केला ह्मणजे सत्तर लाख रुपये तलब लोकांचे निघाले आहेत ते प्राण घ्यावयासी अंतर करणार नाहींत. ते वेळेस अयोध्येंत आणून, तुह्मांस अमदखां येऊन, हात रुमालानें बांधून भेटवूं. वजिर अजम ह्मणतील, पांचा स्वारांनशीं अहमतखानानीं यावे. बल्की, यांहीं डेरे, अयोध्येकडे कूच करून, तुह्मांस अहमतखानाकडे पाठवावें. तुह्मी इकडून अहमतखानांनी यावे. यांच्या तुमच्या भेटी होऊन सलुख ठैरावाल. सलुख बिघाड ठैरावाल. बिघाड ठैरावाल तरा, त्याचा तुमचा शिष्टाचार हावून मग क्षात्रीय धर्माचा आहे तर, जे वागवितील तर परस्पर क्षात्रीय धर्म करून आपुण सर्वां ठायीं मेजमानीस जाऊन, यखलासानेंच त्यांचे घर धुवूनहि काढावें; आणि सर्वांत नेकनामहि असावें. जैपुरकरास सुभेदारांहीं आणवून राज्य स्थापिलें. टिका तो आला नाहीं. तो काढवून राज्य स्थापना केलियावर त्यांचे लोकांकडून त्यांच्या किमपिहि ध्यानांतहि नसतां शहरावर दंड ठैरला. याकरितां शहरांनीच प्राणाचें गिर्हाईक भेटलियावरी बळवायआम् जाला. या गोष्टीस माधोसिंगांनी काय करावें ? कोण्ही समाजतीस न आला ह्मटलें, तरी तुह्मी समाजतीस आलेत. रफा जाली. आतां सुभेदारांस ह्मणावें जे, माधोसिंगास खंडेरायाप्रों।च जाणा; तैसाच रामसिंग जाणा; आणि पातशाहास सर्व प्रकारें आपल्याकडे मुतवजे जाणून, उभयतां सुभेदारांहीं चार दिवस वकील मुतलक करून, पठाणास आज्ञेत ठिवून, नवाबास सुभ्यास पोहंचवावा. मग च्यार रुपये अधिक मिळवोत अथवा कमी मिळवोत, आपला बोल वर राहून रसायनसें दिसेल. त्यास, वजिर अजम या गोष्टीस कदापि चाहणार नाहीत. सार्वभौम अमात्याचा मित्र आहे किंवा नाहीं हें पुर्ते जाणत असतां, कां उडी घालितात ? त्यासी नामकदुर सांगणे ; नाहीतर बरसात आलियावरी यांसी सुभ्यांत पोहंचावणे. कासचे इकडे यमुनेस पोहंचवायासी वजिरासी येणें लागेल. जर येसे जाले तरी, आपेश मर्हाष्टास आलियावरी दुनियांत जागा राहणार नाहीं. वजीर बुडालिथावर, कोण्ही तर्ही बरें ह्मणणार आहे. तेव्हा सर्वांस बुडविलियाचे सर्व बोढें घ्यावयासी तयार होतील. जर मित्र मित्र ह्मणून काम करून घ्यावे, आणि विलायतींत एक रांघोवा पडे, आणि सहुलतीनें यांचा अमल टंट्यांत केला हे नांव करून कोठें न जुंझती हिकमतीनेंच एक्या कामाचें विनाजोखों येश घेऊन बाविसा सुभ्यांत हुकमे करून दक्षण हिंदुस्थान आपली करा, हें उपयोगी असेल ते विचारून कोणेहि प्रकारें लौकर संभाळणे. आणखी चौ दिवसां गुंतेस कां ? कुंथेस का ? ऐसे होईल. अयोध्येकडे गेलियावर सफदरजंग लाखा स्वारांचा सरदार आहे. अहमदखानाचें दिवाळें निघेल. आपल्या आपुण यांजला उठवणें येईल, तेव्हां ठिवा न ठिवा, मारा न मारा. वजिरास उभयथा सुभेa
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २९० ]
श्री शके १६७५ पौष शुद्ध १.
दि॥ हुजरांत यास वेतनाचा ऐवज रसानगी यादी. सन अर्बा रु॥:-
५००० बाजीराव यादव.
७०० मल्हार विनायक.
६०० मोरो शिवदेव.
३०० रामराव जिवाजी.
२०० सदाशिव अनंत.
३०० गंगाधरजी चिटनीस.
----------
७१००
एकूण सात हजार एकसे सुदामत प्रमाणें केलें असे. तरी प्रांत वाई येथील हुजरांतीचे ऐवजी पावते करणें ह्मणून सनदा.
१ दादो महादेव
१ हैबतराव भवानी शंकर
----
२
एकूण दोन पत्रें दिल्हीं आहेत. छ. २९ सफर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८९ ]
श्री शक १६७५ पौष शुद्ध १.
राजश्री दामोधर माहादेऊ गोसावी यासीः- स्नो मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरिः राजश्री बापूजी त्र्यंबक यांचे प्रयोजन आहे; तरी, समागमें घेऊन येणे. जाणिजे. अगत्य घेऊन येणें. जाणिजे. छ. २९ सफर. बहुत काय लिहिणे ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८८ ]
श्री शक १६७५ मार्गशीर्ष वद्य २.
राजश्री दामोधर माहादेऊ गोसावी यासीः- स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरीः राजश्री बापूजी त्र्यंबक भेटीस लस्करास येणार; त्यास, तुह्मी याल ते समयीं त्यांस समागमें घेऊन येणें. रा। छ. १६ सफर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८७ ]
श्री शके १६७५ मार्गशीर्ष शुद्ध ६.
राजमान्य राजश्री सदाशिव विश्वनाथ दि॥ दामोधर महादेव गोसावी यासिः--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ. मौजे चांदसीच्या असाम्या ४ व जलालपुरची असामी एक येकूण आ। पांच मौजे अधरठें येथें गेल्या आहेत, ह्मणोन विदित जाहलें. तरी या गांवच्या असाम्या तुमचे गांवीं गेल्या आहेत त्या रा। अंताजी रुद्र कमाविसदार जागीर त्रिगलवाडी यांचे हवालीं करणें. व बाळ ठाकूर राघोबा ठाकूर यांचे कर्ज अधरठें येथें आहे तें देत नाहीं ह्मणोन कळलें. तरी वाजवी कर्ज असेल तें खताप्रों। व्याजसुद्धां देवणें. जाणिजे. छ. ६ सफर. आज्ञा प्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८६ ]
श्री शक १६७५ आषाढ वद्य ३
राजश्री सटवोजी जाधवराऊ गोसावी यांसीः-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
जनार्दन बल्लाळ आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल ता। छ १६ माहे रमजान पावेतों क्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पा।. विशेष. संस्थान नरवर येथील कारकुनीचा ऐवज सन इहिदे, व सन इसन्ने दुसाला रुपये १००० एक हजार राजश्री जयराम नाईक याजबरोबर पाठविले ते सदरहू प्रों। पावले. सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति. तम सलासचा ऐवज राहिला आहे तो पाठवून द्यावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८५ ]
श्री शके १६७५ आषाढ शुद्ध १३.
श्री ह्माळसाकां-
त चरणीं तत्पर खंडो-
जीसुत मल्हारजी
होळकर.
राजश्री दामोदरपंत गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मलारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें, विशेष. तुझीं पत्र पाठविलें तें पाऊन वर्तमान कळों आलें. आमची हिंदुस्थानास जावयाची त्वरा आहे. त्यास, तुह्मींही नाशकींहून कूच केलें ह्मणून लिहिलें. त्यासी, आपलाही मुहुर्त आज शुक्रवारचा आहे. कूच होईल. तर तुह्मीही येणें. तुमचे आमचे भेटीचा योग घडोन आलियावर परस्पर वर्तमान कळेल. इकडे योग न जाला तर दिल्लीस जातां तो घडोन येईलच. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणे ? छ. १८ रमजान. हे विनंति.
मोर्तब सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७४
१५८४ श्रावण वद्य ७
मसूरल अनाम राजश्री बाजी सर्जाराऊ जेधे देशमुख ता। भोर प्रति राजश्री सिवाजी राजे सु॥ सलास सितैन अलफ तुह्मी बखैर पाठवली लिहिले जे आपण माणसे जाउलीकडे नेईन तरी निंबाजीस कागद दिधला पाहिजे ह्मणउनु लि॥ तरी दाटून जाउलीकडे माणसे काशास नेऊ पाहता जैसी आहेत तैसी असो देणे व दताजी ककास कौल पाठवणे ह्मणउनु लि॥ तरी कौल पाठविला असे तरी त्यास देणे आणि त्यासी हुजूर पाठवणे मोर्तब सुद
मर्या
देयं विरा
जते
तेरीख २० माहे जिल्हेज
जिल्हेज सुरुसूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ २८४ ]
श्री शके १६७५ ज्येष्ठ वद्य ७.
राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासीः-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
खंडेराव होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. राजश्री बिजेसिंग खेत्री यांसी श्रीकाशीस राजश्री बळवंतसिंग राजे याजकडे पैक्याच्या तहसिले निमित्या पाठविले आहेत. त्यास, तुह्मांपासी येतील. तरी, नवाब मनसुरअल्ली याजकडील राजीन्याचें दस्तक यांसी करवून देविणें ; आणि खाबंदचाकरी जलदीनें करून येत तो अर्थ करणें. अनमान न करणें. जाणिजे. रा। छ. २१ माहे साबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तब सुद )
( खंडेराव होळकरस्य मुद्रेयं )