[ २७१ ]
श्री. शक १६७४ कार्तिक वद्य १२.
पु॥ राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासीः----
उपरि याच्या मनांत जैसा स्त्रेह चालतो तैसा चालावी; गडकिल्याविसीं इमानप्रमाण बेलभंडार घ्यावा; आपला इमान घ्या; ऐसें जाहालें तरी येविसींचा जाब यथाज्ञानें आज्ञेप्रमाणें करूं, ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशास, पूर्वी नवाबाचा आमचा स्नेह जाहिरा मात्र होता. परंतु पेशजी सैद लस्करखान आले; यांचे मारफातीनें परस्पर वचनप्रमाणपूर्वक स्नेह जाला. त्या दिवसापासून नवाबाचे खैरख्वांईत आह्मीं किमपि अंतर न केलें. कितेक नवाबाचे मतलब हासील व्हावे, याकरितां नानाप्रकारचे प्रयत्न करनाटकविशयीं वगैरे केले. कांहीं आपल्या खावंदापाशीं बदलामहि जाहाले. तथापि नवाबाचें मनाकधारण करावें, याविचारें जें करणें तें केलें. ऐसें असतां गरजगो लोकांनीं मनास येईल तसे नवाबास समजाविलें; त्यावरून संदेह मनांत आणून रूक्षता धरिली. तर, आजी नवाबाप्रमाणें बुद्धिमंत दुसरा पातशाहींत कोण आहे ? तथापि दुसर्याच्या सांगीवर विकल्प वाढविला. असो. थोर आहेत ! जें उत्तम जाणतील तें करतील. आह्मीं मतलब घातले, ह्मणून वाईट मानिलें; तर चित्तास वाटेल तें करावें. परंतु सविस्तर आमच्या मतलबाची याद पाहावी; आणि अंदेशा करावा. कीं त्यांत नवाबाचा नफा किती व तोटा किती ? ऐसा विचार करून जे जाबसाल करणें ते करावे. मतलब करून न दिल्हे तर त्याविना आमची कांहीं बहुतशी हान आहे, यास्तव वारंवार लिहितो असें नाहीं. परंतु नवाब, आह्मी एक, हें अटकपासून रामेश्वरपर्यंत लौकिक आहे. त्यास, आतां नवाबाच्या व आमच्या मनांत विकल्प, हें उभयपक्षीं श्रियस्कर नाहीं. याकरितां चित्तास हळहळ ! वरकड, होणें तें दैवगतीनेंच होईल. राजश्रीच्या जावयास जागीर द्यावयाचा मजकूर तर, राजश्रीच्या चित्तास संतोष होवून कर्नाटक वगैरे कांहीं राजश्रीपासून नवाबाचें कार्य करून द्यावें, याअन्वयें बोलिलों होतों. आह्मी कर्नांटकाविसीं राजश्री स्वामीसहि पैगाम करित आलों. त्याचीं बजिनस पत्रें खान येथें असतां दाखविलीं. असो ! फार विस्तार बोलोन काय ? सर्वहि असत्भावनाच नवाबांनी चित्तांत आणिल्यास यत्न काय ? असो ! खान मध्यस्त आहेत. एकांती सविस्तर नवाबास वृत्त आमचे सबाह्मअभ्यंतर मर्जीचे निवेदन खानांनी करावें. तदुत्तर जे आज्ञा करितील ते लेहून पाठवावे. आह्मांस नवाबाचे स्नेहाची फार उमेद आहे. किल्याविसीं, वरकडविसीं जें नवाबास उत्तम तेंच आह्मीं करावें, ऐसा बेलभंडार आह्मांपासून घ्यावा, व नवाबांनीहि निखालसपणें नानकुरान द्यावें. परस्पर निखालसता व्हावी; लौकिकांत विरुद्ध नसावें; हेंच अतःकरणपुरःसर चाहातों. इतकेंहि असोन, नबाब निखालसता न करीत, तरी आमचा उपाय काय ? सारांश सविस्तर खानानें नवाबासीं बोलावें ; उत्तर होइल ते लेहून पाठवावें; ह्मणजे पुढे मागें खानावर उभयपक्षींचा शब्द येणार नाही. रा॥ छ. २४ मोहरम शुक्रवार. बहुत काय लिहिणें ?
( लेखन सीमा. )