[ २७५ ]
श्री शके १६७४ फाल्गुन वद्य २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत व राजश्री पुरुषोत्तमपंत स्वामीचे सेवेसीः--
पो। अंताजी माणकेश्वर सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मांस फौजेच्या कारभारामुळें व पातशाहाच्या घरच्या चाकरीमुळें वर्षासन मोईन करार केली रुपये ५०,००० पनास हजार. त्याप्रो। साल दरसाल घ्यावे. तुह्मी आपणापासून व पातशहापासून उर्जित सर्वस्वें करावें. यंदाचे व सन सलासचे रुपये पनास हजार तुह्माकडे फौजेचा पैका येणें आहे रुपये साडेच्यार लाख त्यापैकी देऊन. नवी फौजेची सनद नसतां तुह्मापासून घेतले रुपये ३,००,०००. सदरहू तीन लाख रुपयांची नेमणुकेची सनद श्रीमंतांची अथवा सरदारांची तुह्मांस आणून देऊन. जरकरितां श्रीमंतांची अथवा सरदारांची तीन लाखाची सनद आणून न देऊं, तरी तीन लाख रुपये आपण तुमचे घरां भरून देऊन. तुह्मी सर्व प्रकारें आह्मांसी इमानें प्रमाणें चालावें. तुह्मांस ईश्वर दरमियान आहे. दुसरा अर्थ नाहीं. जुनें फौजेची पांचमाही रोजमरियाची दीड लाख रुपयाची सनद नाहीं तीही आणून देऊं. एकूण साडे च्यार लाखाची सनद आणून देऊं. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असों दीजे. हे विनंति. छ. १५ जमादिलावल, सु॥ सलास खमसैन मया व अलफ. हे विनंति.