[ २७३ ]
श्री.
शके १६७४ माघ वद्य १३.
श्रीमंत राजश्री दामोधरपंतदादा स्वामींचे सेवेसीः--
पो। बाळाजी शामराज कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. यानंतर पां। टोंक व रामपुरा खुर्द येथील मामला श्रीमंत राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जयाजी शिंदे या उभयतापासून करून घेतला. त्याची रसद रु॥ ४,०१,२५१ च्यार लाख एक हजार दोनशें एकावन भरले. त्या भरणियांत तुह्मांपासून रु॥ १,००,००० लक्ष घेऊन भरले. त्यास, सदरहू रु॥ त्याचें खत आमचे नांवे आहे. त्यास व्याज दरसदे रु॥ १।. सवोत्रास हुंडणावळ दरसदे रु॥ ४ च्यार व मुशाहिरा रु॥ ४ च्यार लेहून घेतला आहे. त्यास, सदरहू व्याज मुदल मुशाहिरा हुंडणावळ जो सरकारांतून वसूल होईल तो रु॥ यांत हिसेरसीद बसून यथाविभागें वाटून घेऊं. मिति सके १६७४, अंगिरानामसंवत्सर, माघ वद्य १३. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.