Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३१९ ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष वद्य १.
राजश्री दामोदर महादेव स्वामी गोसांवी यांसी :-
उपरि. दिल्लीचा कारभार तो होतच आहे. त्यास, येथें वैरणीचीं तसदी फार जाली आहे. त्यास, तुमच्या विचारास येईल तरी येथून कूच करून झीलावरी तरी जाऊं. तरी याचा जाब काय तो लेहून पाठवणें. त्यासारिखें केलें जाईल. जाणिजे. छ २० सफर. बहुत काय लिहिणें.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३१८ ]
श्रीशंकर शके १६७६ मार्गशीर्ष वद्य ४.
राजश्री दामोदर महादेव गोसावी यांसी :--
उपरि. कृष्णागर उत्तम व च्याहा घ्यावयासी प्याले सगी उत्तम, दडस, लवकर न तापेत, ऐसे दोन व अगर अदसेर पाठवून देणें. जाणिजे. छ. १८ सफर. वादेयान नखताई वजन पक्का पावसेर औषधासाठीं पाठवून देणें. जाणिजे. छ. मजकूर.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७७
श्री १५८९ माघ शुध्द १
नकल
राजश्री मोकदम पाटिल व कुलकर्णी मौजे वेलवडी ता। वेलवडखोरे प्रा। मावल गोसावी यासि
श्रीा मोकदम पाटिल व कुलकर्णी मौजे पसुर रामराम विनती विशेष सई आवा ढोर देशमुख यास जिवमान पावेतो मौजे जतपड येथील जमीन च्यार पैसे राजश्री भानजीबावा देशपांडे व गावकुलकर्णी यानी आपले इनामापैकी नेमून दिल्ही परतु सई आवाचे साभाल करण्यास तुमचे हवाली बावानी केली ती जमीन तुह्मी मेहनत मशागत करून बाईचा साभाल करावा हे आमचे गु॥ ठराऊन तुह्मी कबूल केलेप्रमाणे चालावे व सिकेकरी ढोर देशमुख यानी खातरी केल्याप्रमाणे चालावे मि॥ माघ शु॥ १ शके १५८९ हे विनंती
सु॥ सिता तिसैन अलफ साली आपाजीराऊ सुभेदार यानी माहाराजाचे आज्ञेवरून राजगड मु॥ पचाईत करून सई आवाची जमीन जतपडची प्रभु देशपांडे याची परत द्यावयाची ठरली छ १५ मोहरम मोर्तब असे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३१७ ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष वद्य ४.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री त्रिंबक गोजरो गोसावी यासि :--
सो। पुरुषोत्तम महादेव व देवराव महादेव नमस्कार उपरि. तुह्मी दारू मणभर व गोळ्या लोखंडी दाहा सेर पाठविल्या. त्या पावल्या. जाणिजे. छ १८ सफर, सु॥ खमस खमसैन ********* ***** काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७६
१५८४ कार्तिक वद्य ७
मा। अनाम सर्जाराऊ जेधे देसमुख ता। रोहिडखोरे राजश्री सीवाजि राजे सु॥ सलास सिर्तन अलफ मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती ह्मणौन जासुदानी समाचार आणिला आहे तरी तुह्मास रोखा अहडता च तुह्मी तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे लेकरेबाळे समत तमाम रयेति लोकास घाटाखाले बाकाजागा असेल तेथे पाठवणे जेथे गनिमाचा आजार पहुचेना ऐशा जागीयासि त्यासि पाठवणे ये कामास हैगै न करणे रोखा अहडता च सदरहू लिहिलेप्रमाणे अमल करणे ऐसियासि तुह्मापासून अतर पडिलियावरि मोगल जे बाद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बैसेल ऐसे समजोन गावाचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाले जागा असेल तेथे पाठवणे या कामास एक घडिचा दिरग न करणे तुह्मी आपले जागा हुशार असणे गावगना हि सडेकडिल सेतपोत जतन करावया जे असतील त्यास हि तुह्मी सागणे की डोगरवर असिरा कुबल जागा आसरे ऐस त्यासि सागणे व गनीम दुरून नजरेस पडता च त्याचे धावणीची वाट चुकउनु पलोन जाणे तुह्मी आपले जागा हुशार असणे मोर्तब सूद
रुजु सुरनिवीस
सुरु सूद
तेरीख २० माहे रबिलोवल
रबिलावल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३१६ ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष शुद्ध १२.
राजश्री दामोदर माहादेव गोसांवी यांसीः--
उपर. सरकारांत बांसाचें प्रयोजन आहे. तरी बांस सुमारें २५ पंचवीस पाठवून देणें. याखेरीज केळीचीं पाने सुमारें २०० दोनशें पाठवून देणें. छ ११ सफर.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३१५ ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष शुद्ध ११.
राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसीः--
उपरि. लाला बाळ गोविंद याचा ऐवज हरएक तजवीजीनें आपल्याकडे सत्वर ये तें करणें. तुह्मापाशीं ऐवज आलियावरी माणसे गाजुद्दीखानाचीं व आपले राऊत देऊन ऐवज हुजूर पोहचवणें. जाणिजे. छ १० सफर. बहुत काय लिहिणें.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३१४ ]
श्री शके १६७६ कार्तिक वद्य ५.
राजश्री दामोदर माहादेव स्वामी गो। यांसीः--
उपरि. समसामुद्दौला याजकडील रुपयाचा मजकूर तुह्मासी गंगोबाचे रुबरु सांगणें तो सांगितलाच आहे. त्यास, समसामुद्दौला रुपये रोख देत असेल तरी घेणें. नाहीं तरी त्या रुपयांचा कायतो विचार करून रूपये रोख येत तें करणें. नाहीं तर या रुपयाकरितां चार दिवस गुंता पडेल. याजकरितां लिहिलें असे. जाणिजे. छ १९ मोहरम.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३१३ ]
श्री शके १६७६ कार्तिक शु॥ २.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री हैबतराव भवानीशंकर सुभेदार प्रांत वांई यांसीः--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ खमस खमसैन मया व अलफ. बा। देणें दि॥ हुजरात सालगुदस्ताप्रमाणें वेतनाचा ऐवज रुपये.
५००० बाजीराव यादव खासा.
७०० मल्हार विनायक.
६०० मोरो शिवदेव.
३०० रामराव जिवाजी.
२०० सदाशिव आनंत.
३०० गंगाधरजी चिटनीस.
---------
७१००
येकूण एकाहत्तरसे रुपये देवीले असेत. प्रांत मजकुरचे हुजरांतचे ऐवजी पावते करून पावलियाचे कबज घेणें. व सालगुदस्तचे वरातेपैकी बाकी राहिली असेल ती देणें. जाणिजे. छ. २९ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? मोर्तब लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३१२ ]
श्री शके १६७६ आश्विन वद्य १३.
श्री शाहूराज-
पदांभोजभ्रमरायित
चैतसः । बिंबात्मजस्य मुद्रैषा
राघवस्य विराजते.
राजश्री दामोधर माहादेव गोसांवी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य. स्नो।
रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लिहिलें वर्तमान विदित जालें. याचप्रकारें निरंतर पत्रीं आपणाकडील साकल्यार्थ लेहून पाठवीत जाणें. यानंतर राजश्री सदाशिव हरी आले यांणी कितक आपले ममतेचा अर्थ निवेदन केला. ऐशियास प्रसंगोपात आह्माकडलि कार्यभागास तुह्मापासून अंतराय होणार नाहीं हा भरोसा आहे. प्रस्तुत राजश्री मल्हारजी होळकर यांस आह्मी आपले स्वकार्याविसींी लिहिंले आहे. तो अर्थ चित्तांत आणून कार्यभागांत चित्त पुरवून कार्यसिधी होये ते गोष्टी करणें. वरकड राजश्री सदाशिव हरी लिहितां कळो येईल. रा। छ. ११ माहे जिल्हेज. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
मोर्तब
सुद.
पौ। छ. ९ रबिलाखर.