[ २७० ]
श्री. शके १६७४ कार्तिक वद्य १०.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसिः–
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्ने॥ बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपारि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. नवाबांनी राजश्रीचे जावयाचे जागिरीचे मजकुरावरून वाईट मानून तुटता सालजाब तुह्मांसी केला. वरकड नासरजंगाचे मर्जीप्रमाणें गरमी दाखवावी, ऐसा विचार अवलंबिला. त्यास, थोर आहेत ! जें इच्छितील तें करितील ! करोत! आह्मांसी स्नेह चित्तापासून करावा, सर्वप्रकारे आह्मांस निखालस करावें, यासाठी नवाबांनीं जानबास व खानास पाठविलें. त्यांपाशीं किल्याचा मजकूर नवाबाचे मर्जीप्रों। आह्मीं कबूल केला. वरकडहि कितेक अर्थ जे नवाबाचे उपयोगाचे, तेच सांगून पाठविलें. आमचा स्वार्थ त्यामध्यें कांहीं नाहीं ! असें असतां नवाबांनी सर्व एकीकडे ठेवून गरमी दाखवूं लागले तर, आह्मांस श्रीकृपेनें काय चिंता आहे ? किल्याचा तर आह्मांपासून गरमनरम मध्यस्थांकरवीं बोलवून इमानप्रमाण आह्मांपासून घ्यावा, व आमचे जाबसाल उडवून द्यावे, असें करूं पाहातात; तर तें कैसे आह्मांस अनकूल पडतें ? जे जे अर्ज आह्मी मध्यस्थाबराबर सांगून पा। आहेत ते आयकून, सर्वप्रकारें आपलें नानोकुरान करून देतील, तेव्हां आह्मीहि किल्याविसीं इमान देणें तें देऊं. नाहीतर जें त्यास बरें दिसेल तें तें करितील. आह्मी गनीमलोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहों ! छ. २३ मोहरम वृहस्पतवार संध्याकाळ
( लेखनसीमा. )
० श्री ॅ
राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाळाजी बाजीराव मुख्य प्रधान