[ २८७ ]
श्री शके १६७५ मार्गशीर्ष शुद्ध ६.
राजमान्य राजश्री सदाशिव विश्वनाथ दि॥ दामोधर महादेव गोसावी यासिः--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ. मौजे चांदसीच्या असाम्या ४ व जलालपुरची असामी एक येकूण आ। पांच मौजे अधरठें येथें गेल्या आहेत, ह्मणोन विदित जाहलें. तरी या गांवच्या असाम्या तुमचे गांवीं गेल्या आहेत त्या रा। अंताजी रुद्र कमाविसदार जागीर त्रिगलवाडी यांचे हवालीं करणें. व बाळ ठाकूर राघोबा ठाकूर यांचे कर्ज अधरठें येथें आहे तें देत नाहीं ह्मणोन कळलें. तरी वाजवी कर्ज असेल तें खताप्रों। व्याजसुद्धां देवणें. जाणिजे. छ. ६ सफर. आज्ञा प्रमाण.