[ २८५ ]
श्री शके १६७५ आषाढ शुद्ध १३.
श्री ह्माळसाकां-
त चरणीं तत्पर खंडो-
जीसुत मल्हारजी
होळकर.
राजश्री दामोदरपंत गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
मलारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें, विशेष. तुझीं पत्र पाठविलें तें पाऊन वर्तमान कळों आलें. आमची हिंदुस्थानास जावयाची त्वरा आहे. त्यास, तुह्मींही नाशकींहून कूच केलें ह्मणून लिहिलें. त्यासी, आपलाही मुहुर्त आज शुक्रवारचा आहे. कूच होईल. तर तुह्मीही येणें. तुमचे आमचे भेटीचा योग घडोन आलियावर परस्पर वर्तमान कळेल. इकडे योग न जाला तर दिल्लीस जातां तो घडोन येईलच. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणे ? छ. १८ रमजान. हे विनंति.
मोर्तब सूद.